करंजविहिरे येथील उपकेंद्रवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST2021-03-31T04:10:13+5:302021-03-31T04:10:13+5:30

करंजविहिरे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही केंद्रावर दि. २८ रोजी रात्री सव्वाअकरा वाजता करंजविहिरे बाजूकडून शिवे ...

Stone throwing at the substation at Karanjvihire | करंजविहिरे येथील उपकेंद्रवर दगडफेक

करंजविहिरे येथील उपकेंद्रवर दगडफेक

करंजविहिरे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही केंद्रावर दि. २८ रोजी रात्री सव्वाअकरा वाजता करंजविहिरे बाजूकडून शिवे गावाकडे जाणाऱ्या अज्ञात इसमाने उपकेंद्राच्या आवारात आतमध्ये येत कार्यालयाचा बाहेरून दरवाजा लावून कार्यालयावर दगडफेक केली. . कार्यालयाच्या खिडकीवर दगड मारून खिडकीच्या काचा फोडल्या. याबाबत करंजविहिरे उपकेंद्रांमध्ये कामावर असलेले सुजित नेहरे यांना काही क्षण हा काय प्रकार चालू आहे हे समजले नाही. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा लावला असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. याबाबत त्यांनी घडलेला प्रकार कनिष्ठ अभियंता विजय कांबळे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविला. याबाबत पाईट पोलीस चौकी येथे कनिष्ठ अभियंते आर. कांबळे यांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दाखल केली.

.

करंजविहिरे ता. खेड येथे दोन अज्ञात इसमांनी दगडफेक करुन नुकसान केलेली उपकेंद्राची इमारत.

Web Title: Stone throwing at the substation at Karanjvihire