पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 13:15 IST2021-04-08T13:14:30+5:302021-04-08T13:15:15+5:30
लसीकरण मोहीमेला मोठा धक्का

पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला
पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. पुढचा साठा कधी येणार हे माहित नसल्याने लसीकरण मोहीमेला मोठा धक्का बसला आहे.
पुणे शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपुर्ण जिल्ह्यात दररोज एक लाख लोकांचे लसीकरण केले जावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन लसीच्या साठ्यामुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आली होती.
त्यातच आता महापालिका क्षेत्रात देखील हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात पालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. काल रात्रीच्या आकडेवारी नुसार एकुण ४७ हजार लसी शिल्लक होत्या. मात्र या सगळ्या लसी आता वाटुन टाकल्याने महापालिकेकडे साठा पुर्णपणे संपला आहे.
दरम्यान वाटलेल्या लसींचा हा साठा दोन दिवस पुरेल आणि लसीकरण मोहीमेत अडचण येणार नाही असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.