शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:19 IST

मुंबई व पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी सुमारे १७६ मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करत असतात.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही मंडळांकडून यंदा होणार नाही दहीहंडीचा उत्सव

- नारायण बडगुजरपिंपरी : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणीत करण्यात येत असला तरी थरावर थर चढवून विक्रम करण्याचा गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. सुरक्षिततेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सुदैवाने गेल्या काही वर्षांत या उत्सवादरम्यान उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र ठिकठिकाणी वाहतूककोंडी, तसेच ध्वनिप्रदूषण होत असल्याचे दरवर्षी दिसून येते. तथापि, उत्सव साजरा करताना नियम पाळा असे सांगण्याची वेळ आली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही मंडळांकडून दहीहंडी उत्सव यंदा साजरा होणार नसल्याचे दिसून येते. 

मुंबई व पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी सुमारे १७६ मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करत असतात. यातील १४ मंडळे मोठी आहेत. त्यांच्याकडून सिनेतारकांना, छोट्या पडद्यावरील कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यामुळे या मंडळांच्या दहीहंडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. अशा मंडळांकडून मोठ्या प्रमाणात इनामही लावले जाते. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये खास असे गोविंंदा पथक किंवा गोपिका पथक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील पथके तसेच मावळ व जिल्ह्यातील काही गोविंदा पथके या दहीहंडी फोडून या ह्यइनामाह्णचे लोणी चाखतात. मात्र हा उत्सव साजरा होत असताना ध्वनिप्रदूषण होते व वाहतूक नियमन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.

मोठ्या मंडळांसाठी बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असून, पोलिसांनी मंडळांना सूचना केल्या आहेत. वाहतूक नियमनासाठी मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावेत, संशयित व्यक्ती, वाहन आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

पिंपरी-चिंचवडची दहीहंडी;  मुंबईचे गोविंदा पथक पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी, निगडी, सांगवी, चिंचवडगाव, परिसरात काही जुनी मंडळे आहेत.  याठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र पिंपरीगाव तसेच आयटी पार्क असलेल्या माण येथे पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होतो. एका लाकडी खांबाला दोरीच्या साह्याने दहीहंडी बांधली जाते. पारंपरिक वाद्य वाजवून मान असलेल्या व्यक्तीकडून खांबावर चढून किंवा लाकडी काठीने किंवा डोक्याने दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर गोपाळकाल्याचे वाटप केले जाते. भोसरी, हिंजवडी, वाकड, निगडी, पिंपरीगाव, रहाटणी आदी भागांत मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यात सिनेतारकांचे आकर्षण असते. यातील काही दहीहंडीला कापोर्रेट लूक असतो. लाखो रुपयांची बक्षिसे असतात.

अशी आहे नियमावली१८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा.२० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.मानवी मनोºयावर पाण्याचा मारा करू नये.कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश्य डिजेचा वापर शक्यतो टाळावा.आपत्कालीन व्यवस्था असावी.

दहीहंडी उत्सवासाठी मंडळांनी सुरक्षीततेची खबरदारी घ्यावी. वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, गादी किंवा मॅट आदी सुविधा मंडळांकडे उपलब्ध असाव्यात. उत्सव मुख्य रस्त्यावर साजरा करू नये. वाहतूक नियमांचे पालन करून तसेच गोंधळ, हुल्लडबाजी होणार नाही, यासाठी मंडळांनी गदीर्चे नियमन करावे. - रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

तरुणांसाठी आकर्षणाचा विषय असला तरी दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे सुरक्षीततेचे सर्व नियम पाळतो.  गर्दी असूनही दुर्घटना घडलेली नाही. पुराचे संकट ओढावल्याने यंदा हा उत्सव साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्यात येईल.  - राम वाकडकर, संस्थापक, सद्गुरू मित्र मंडळ, वाकड

टॅग्स :PuneपुणेDahi Handiदहीहंडीpollutionप्रदूषणPoliceपोलिसCourtन्यायालय