पनवेलमध्ये भाजप नेत्याच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 05:28 IST2019-04-04T05:27:57+5:302019-04-04T05:28:15+5:30

वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला

Stealing the BJP leader's house in Panvel | पनवेलमध्ये भाजप नेत्याच्या घरी चोरी

पनवेलमध्ये भाजप नेत्याच्या घरी चोरी

पनवेल : भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीतील एस्पायर हायनेस या इमारतीमधील सातव्या माळ्यावरील घरात चोरी झाल्याची घटना बुधवारी उडकीस आली. चोरांनी लाखोंचे दागिने लंपास करून पलायन के ले.

वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचे बोलले जाते. बुधवारी देशमुख कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील मिडलक्लास सोयायटीत राजकारणी, बांधकाम व्यावसायिक आदीसह पनवेल शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण येथेच राहतात. एवढी मोठी चोरीची घटना या परिसरात आधी झाली नव्हती. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीसांत करण्यात आली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करीत आहेत. तसेच श्वानपथकानेही घटनास्थळी भेट दिली.
 

Web Title: Stealing the BJP leader's house in Panvel