शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या २७९ जणांचे पासपोर्ट रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 21:46 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७९ वाहनचालकांचे पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले आहेत.

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, या हेतूने वाहतूक शाखेने कडक धोरण स्वीकारले असून १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७९ वाहनचालकांचे पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले आहेत.         शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याला काही अंशी बेशिस्त वाहनचालकही कारणीभूत आहेत हे लक्षात घेऊन वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध  ठोस कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानुसार १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत वाहतुक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरवात केली. वाहतूक शाखेने १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या १ हजार ५०३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ३३८ जणांचा समावेश आहे़यामध्ये मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.  त्या खालोखाल भाडे नाकारणाऱ्यांची संख्या आहे.    प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ३५ परवाने विचाराधीन असल्याची वाहतुक शाखेचे नियोजन विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी २७९ जणांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले असून त्यांपैकी बहुतेकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा किमान १ गुन्हा दाखल आहे. काही जणांवर २ किंवा ३ गुन्हे आहेत, त्यांचे पासपोर्ट अर्ज पडताळणी रोखून धरले आहेत. अशांवर आणखी काही गुन्हे आहेत का याची पडताळणी करुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा स्पष्ट उल्लेख करुन हे अर्ज पाठविण्यात येणार आहेत.  त्यामुळे पासपोर्ट कार्यालय त्यांचे अर्ज फेटाळूही शकतात, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली़ 

रॉग साईटने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ४ तासात दोषारोपपत्रनो एंट्रीमधून वाहन चालकांविरुद्ध भारतीय दंडसंहीता २७९ या कलमान्वये वाहतुक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली. दरम्यान सोमवारी दत्तवाडी वाहतुक शाखेने रॉग साईउने येणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर अवघ्या चार तासांमध्येच संबंधीत वाहनचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २७९ या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील हे दत्तवाडी वाहतुक पोलिसांनी पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले़ व न्यायालयाने आरोपीला दंड केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसnewsबातम्या