शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam : फर्ग्युसन रोडवरील दुहेरी वाहतूक स्थगित; पदपथाचे काम सुरू : दहावीच्या परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 20:09 IST

SSC Exam : दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी दुहेरी वाहतूक स्थगित

ठळक मुद्देललित महल चौक ते म्हसोबा गेट चौकादरम्यान उजवीकडे पदपथाचे काम सुरू

पुणे : फर्ग्युसन रोडवर संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चापेकर चौक (कृषी महाविद्याालय, म्हसोबा गेट) दरम्यान असलेली वाहतूक दुहेरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल चौक ते म्हसोबा गेट चौकादरम्यान उजवीकडे पदपथाचे काम सुरू असल्याने, तसेच दहावीच्यापरीक्षा मंगळवारपासून सुरू होत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी या भागातील दुहेरी वाहतूक स्थगित करण्यात आली.

फर्ग्युसन रस्त्यावरील संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चापेकर चौकादरम्यान दुहेरी वाहतूक योजना सुरू करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) घेतला. त्यानंतर या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल हॉटेल चौक ते वीर चापेकर चौकादरम्यान उजव्या बाजूला पदपथाचे काम सुरू करण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत होती़ त्याचा ताण फर्ग्युसन रोडवरील वाहतुकीवर येत आहे़ ज्ञानेश्वर पादुका चौकापासून अगदी डेक्कनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे गेले दोन दिवस दिसून येत होते़ दहावीचीपरीक्षा मंगळवारपासून (दि. ३) सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे़ वीर चापेकर चौकातून संत श्री ज्ञानेश्वरमहाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध होत नसल्याने दुहेरी वाहतूक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. दुहेरी वाहतूक योजना सुरू केल्यानंतर या भागात पदपथाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीचे नियोजन करताना काही त्रुटी आढळून आल्या. वाहनांची कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. कोंडीमुळे वाहनांची रांग फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौकापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले, असे शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले. ----------------------०००

टॅग्स :ssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालPuneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक