शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By नम्रता फडणीस | Published: March 07, 2024 3:07 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून महिलेला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले

पुणे: वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल केलेल्या राज्यकर अधिका-याचे नाव आहे.  याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यातआल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. अर्ज राज्यकर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता. त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले. जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कठाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMONEYपैसाSocialसामाजिक