शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याने आधी १० रूपये टॅक्स कमी करावा मग केंद्राकडे बोट दाखवावे: चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:12 IST

अजितदादा पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय त्यांना असे वाटते की,सर्व काही केंद्र सरकारने करावे....

पुणे : अजितदादा पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय त्यांना असे वाटते की,सर्व काही केंद्र सरकारने करावे. मास्क काय किंवा पीपीई कीटसह औषधे काय, प्रत्येक गोष्ट केंद्राने द्यावीत.राज्याने आधी १० रूपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रूपये कमी करण्याची मागणी करावी. सगळं द्या द्या असं कसं चालणार? असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडी सरकारला दिला. कॉंग्रेसने इंधन दरवाढी विरोधात पुण्यात आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हा खोचक सल्ला दिला.

पुण्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्ह केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शहरातील कुलकर्णी पेट्रोलपंपावर घोडागाडी नेत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी राज्यात देखील ठिकठिकाणी काँग्रेसकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील आंदोलनात इंधन दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेची लूट करत आहे असा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, तसेच देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले याचा खुलासा करावा अशी मागणीही यावेळी काँग्रेसने केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 

चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना टोला... महापालिकेच्या छोट्या विषयावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी इतकी मोठी झाली की त्याचा कार्यकर्ता हसला तरी तो का हसला? किंवा तो का हसला नाही..अशा बातम्या होतात. काही गोष्टी मानवी स्वभावाला धरून आहेत. कार्यकर्त्याने म्हटले होते की तुम्ही दोन वर्षांसाठी पीएमपीएल म्हटले होते. देवेंद्र यांनी समजावलं पण त्याने राजीनामा दिला. त्या राजीनामा देण्यामध्ये एक तांत्रिक चूक झाली. हा राजीनामा मंजूर केला तर कायदेशीर समस्या उद्भवतील. महापौरांना हे लक्षात आणून देण्यात आलं. यावरून इतकं काय घडलं? लगेच भाजपमध्ये फूट अशा बातम्या आल्या. राष्ट्रवादीचे नवीन शहाराध्यक्ष यांनी पेपरबाजी केली..आपल्या पक्षाचे बघावे ना? आपल्या पक्षाबाबत रोज माध्यमांना सांगत जा.  तुमच्यात काय वाद चालला आहे ते सांगा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी प्रशांत जगताप यांना लगावला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण