शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक रोड स्विपिंग मशिन;फुटपाथ,सायकल मार्ग,कचरा कुंड्या,दुभाजकही होणार स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:54 IST

- या मशिन मध्ये एकाच वेळी  माध्यमातून रस्त्यां सोबतच फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक तसेच स्ट्रीट फर्निचर स्वच्छ करण्याची सुविधा आहे.

पुणे : शहर स्वच्छतेसाठे महापालिकेच्या ताफ्यात चार अत्याधुनिक रोड स्विपिंग मशीन दाखल झाल्या आहेत.या  व्हॅक्युम ऑपरेटेड रोड स्वीपर मशिन असून केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या मशिन मध्ये एकाच वेळी  माध्यमातून रस्त्यां सोबतच फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक तसेच स्ट्रीट फर्निचर स्वच्छ करण्य़ाची सुविधा आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या मशिनचे लोकार्पण करण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह घनकचरा  विभागाचे SI , DSI and Engineers, ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे दिप सिंग उपस्थित होते. महापालिकेकडून १२ रोड स्विपिंग मशिनच्या माध्यमातून शहर स्वच्छता केली जाणार आहे. त्यातील ४ मशिनच्या कामाला शुक्रवारी रात्री पासून सुरूवात करण्यात आली.  महानगरपालिकेने शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता स्वच्छतेसाठी यांत्रिकीकरण रोड स्वीपिंगचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५१६ चौ. किमी. झाले असून लोकसंख्या अंदाजे ७० ते ८० लाख इतकी झाली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १८ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांसाठी रोड स्वीपर वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे पीएम २.५ आणि पीएमे १० या धोकादायक सूक्ष्मधूलीकणांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.  या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून झोन क्र. १ ते ४ मधील रस्त्यांसाठी ७ वर्षांच्या कालावधीसाठी झोननिहाय चार निविदा मागवण्यात आल्या आहेत. या रस्त्यांची साफसफाई भाडेतत्त्वावरील मेकॅनिकल रोड स्वीपर मशीनद्वारे  केली जाणार आहे.  असे होणार काम  या  व्हॅक्यूम ऑपरेटेड रोड स्वीपर मशीन असणार आहेत.  प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी १० किमी लांबीचे तीन रूट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूने तसेच दोन्ही फुटपाथच्या बाजूने मशीन फिरून एकूण ४० किमी साफसफाई करेल. निविदेमध्ये पादचारी पथांची (फुटपाथ) साफसफाई करण्याकरिता अत्याधुनिक पेवमेंट स्वीपर आणि लीफ ब्लोअरचा वापर समाविष्ट आहे. प्रत्येक रूटवर एक मेकॅनिकल रोड स्वीपर मशीन, ११ कामगार, २ पेवमेंट स्वीपर, २ लीफ ब्लोअर, १ ग्रास कटर मशीन, जेटिंग मशीन आणि १ छोटा हत्ती (सीएनजी  टिपपर) तैनात करण्यात येणार आहे. जमा झालेली धूळ आणि माती डंपिंग स्टेशनपर्यंत   नेण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे.  तसेच, झोनमधील स्ट्रीट फर्निचर इत्यादी धुवून स्वच्छ करण्यासाठी हाय प्रेशर वॉशर मशीनचा वापर केला जाणार आहे.  ही स्वच्छता प्रक्रिया रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत केली जाईल. यामध्ये फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक ग्रिल्स आणि स्ट्रीट फर्निचरची साफसफाई समाविष्ट आहे.  यात  ४० किमी रोडची दररोज सखोल स्वच्छता केली जाईल. तर मोठया रस्त्यावर दोन्ही बाजूस चार वेळा ही मशिन स्वच्छता करेल . अशी आहे मशिन मेकॅनिकल स्वीपिंग मशीनमध्ये ६.५ क्युबिक मीटर क्षमतेचा कचरा हॉपर, ३००० लिटर पाण्याची टाकी असलेला रोड स्वीपर आहे. वॉशर आणि स्प्रिंकलर धूळ कमी करण्यासाठी आणि स्वच्छता वाढवण्यासाठी मॅन्युअल स्वच्छतेच्या एक तास आधी काम करतील.या उपक्रमामुळे पुणे शहरातील रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे केली जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. केंंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार धूळ उडवणाऱ्या पद्धतींपेक्षा धूळ शोषून घेणाऱ्या प्रणाली अधिक प्रभावी ठरतात. धूळ कमी करण्यासाठी वॉटर स्प्रिंकलिंग आणि जेटिंग: यंत्रांचा वापर केल्याने माती व धूळ हवेत उडण्याऐवजी जमिनीवरच दाबली जाते.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड