शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:06 IST

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना व तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार गझलकार व शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार आहे. अशी माहीती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.      लोककला क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास हे पुरस्कार दिले जातात. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास पाटील, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे,महोत्सव समितीचे अध्यक्ष मित्रावरुण झांबरे यांनी दिली.

बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘पुणे लावणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. शाहीर अमर पुणेकर ,जय अंबिका कला केंद्र सणसवाडी, कविता बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट घुंगरांचा छनछनाट, आर्यभूषण थिएटर पुणे येथील लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत. महिलांसाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली आहे. लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे. 

टॅग्स :PuneपुणेartकलाBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरcinemaसिनेमा