शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा पुणे महामेट्रोला 'अल्टिमेटम'; येत्या ६ महिन्यांत दोन्ही प्राधान्य मार्ग सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 17:20 IST

कोरोना लॉकडाऊन व कामगार आपापल्या राज्यात गेल्यामुळे मेट्रोचे काम रखडले होते.

ठळक मुद्देडिसेंबरला पिंपरी-चिंचवड : मार्च २०२१ ला वनाज ते गरवारे महाविद्यालय

पुणे: कोरोना टाळेबंदीमुळे रखडलेल्या मेट्रोला राज्य सरकारने आता अल्टिमेटम दिला आहे. येत्या ६ महिन्यात दोन्ही प्राधान्य मार्ग व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्याबाबत त्यांंनी महामेट्रो प्रशासनाला आदेश दिले आहेत. प्रशासनाने याला दुजोरा दिला.

पिंपरी- चिंंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी अशा ३१ किलोमीटर अंतराच्या दोन मेट्रो मार्गांचे काम मागील २ वर्षांपासून सुरू आहे. यात पिंपरी ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्रत्येकी ५ किलोमीटरचे मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. याच मार्गांबाबत उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांंनी ते सहा महिन्यात सुरू करण्याबाबत मेट्रो प्रशासनाला सांगितले आहे. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ यांनी याला दुजोरा दिला.या दोन्ही मार्गांचे काम गतीने सुरू होते, मात्र कोरोना टाळेबंदी व नंतर २ हजारपेक्षा अधिक कामगार त्यांच्या राज्यात गेल्यामुळे चार महिने रखडले. आता ते परत सुरू झाले आहे. पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाची मेट्रो कोचसहित चाचणीही झाली आहे. वनाज ते गरवारे मार्गावर एसएनडीटी महाविद्यालयाच्या वळणाजवळ थोडे काम बाकी आहे. दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ५ याप्रमाणे स्थानके आहेत, मात्र सध्या त्यातील तीनच सुरू करण्यात येतील. ऊर्वरीत स्थानकांचे काम सूरू आहे. हे दोन्ही प्राधान्य मार्ग व्यावसायिक तत्वावर सुरू करण्याचे आदेश ऊपमु्ख्यमंत्री पवार यांंनी दिले आहेत. ते शक्य आहे असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्धानकांची कामे अपूरी असली तरी दोन्हीकडचे मेट्रो मार्ग ९० टक्के पुर्ण झाले आहेत. पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर सिग्नलिंग यंत्रणाही बसवली आहे. वनाज ते गरवारे मार्गावरही लवकरच मेट्रो कोचसह चाचणी घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग विहित मुदतीत सुरू करणे शक्य असून त्याप्रमाणे सर्व कामांचे नियोजन केले असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. 

असे असतील तिकीट दरपहिल्या २ किलोमीटरला- १० रूपये२ ते ४ किमी- २०४ ते १२ किमी- ३०१२ ते १८ किमी- ४० 

 मेट्रो सुरू झाल्यानंतर पहिले वर्ष हेच दर कायम असतील. त्यात वाढ करता येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या