शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्य सरकारने एसटीप्रमाणे 'पीएमपी'लाही आर्थिक मदत करावी: महापौर मुरलीधर मोहोळ           

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 13:45 IST

पीएमपीएमएलला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारनेही मदत करावी.

ठळक मुद्देकेवळ ४५० बसेस रस्त्यांवर धावत असून, यातून केवळ १८ ते २० लाख रूपयांचेच उत्पन्न वाहक, चालक व अन्य सेवक वर्ग मिळून ८ हजाराच्या पुढे कर्मचारी वर्ग कार्यरत

पुणे : लॉकडाऊनच्या काळात पीएमपीएमएलचे दररोज १ कोटी ४८ लाख रूपये याप्रमाणे सुमारे २२६ कोटी ४४ लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले असल्याने, पीएमपीएमएलची सेवा आर्थिक संकटात सापडली आहे़. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड व शहर परिसरातील १ कोटी जनतेला वाहतुक सेवा देणाऱ्या 'पीएमपीएमएल'ला राज्य सरकारने एसटीप्रमाणेच आर्थिक मदत करावी, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे़.    कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात पीएमपीएमएलकडून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच वाहतूक सेवा दिली जात होती. गेली सहा महिने प्रवासी वाहतुक बंद असल्याने, उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. तसेच या काळात बसेस बंदच असल्याने जाहिरातदारांकडूनही भाडे जमा झालेले नाही़ यामुळे सर्वच बाजूने पीएमपीएमएलची कोंडी झाली असून, दररोजचे साधारणत: दीड कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.     पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरात लॉकडाऊनपूर्वी साधारणत: दररोज १५०० ते १६०० बसेस रस्त्यावर धावत होत्या. अनलॉक प्रक्रियेत ३ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापही मिळत नाही. प्रत्येक बसमध्ये एका आड एक प्रवासी बसवले जात असल्याने, निम्म्याच क्षमतेने बस रस्त्यांवर धावतात. आजमितीला केवळ ४५० बसेस रस्त्यांवर धावत असून, यातून केवळ १८ ते २० लाख रूपयांचेच उत्पन्न सध्या मिळत आहे.     पीएमपीएमएलकडे साधारणत: वाहक, चालक व अन्य सेवक वर्ग मिळून ८ हजाराच्या पुढे कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. महापालिकेने नुकतेच यांच्या पगाराकरिता अग्रिम स्वरूपात ११० कोटी १५ लाख रूपये दिले आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला आर्थिक मदत करीत आहे. मात्र कोरोनामुळे महापालिकांचेही उत्पन्न घटले असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी महापालिकांना मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारनेही मदत करावी, अशी मागणी महापौर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नुकतीच केली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPMPMLपीएमपीएमएलMayorमहापौरState Governmentराज्य सरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका