शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:09 IST

गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.

कळस : शेतक-यांनी शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.  कळस ता.इंदापुर येथील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी कर्मयोगी साखर कारखाण्याचे संचालक निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, रमेश खारतोडे, दादा वायाळ,धनंजय खारतोडे, सिताराम खारतोडे, पोपट सांगळे, सतीश ओमासे, विलास खारतोडे उपस्थित होते. 

खारतोडे म्हणाले, महावितरण कंपनीने दर तीन महिन्याला शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचे नुकसान होण्याला राज्य शासन जबाबदार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कळस गावातील वीज आठ तासात वीज पुरवठा पुर्ववत करून द्यावा. अन्यथा या गावात त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. शेती मालाला नसलेले बाजार भाव उत्पादन खर्चात झालेली वाढ या मुळे शेती व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केल्याने पिके गेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

या वेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या बाबत महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले असून विज पुरवठा सुरळीत न झाल्यास कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेmahavitaranमहावितरण