महाराष्ट्र बँक नियमबाह्य कर्ज; वरिष्ठ स्तरावरून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:12 IST2018-06-25T04:12:08+5:302018-06-25T04:12:11+5:30

बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्या आरोपावरुन बँक आॅफ महाराष्ट्राचे

State Bank of India's external debt; Senior level inquiries | महाराष्ट्र बँक नियमबाह्य कर्ज; वरिष्ठ स्तरावरून चौकशी

महाराष्ट्र बँक नियमबाह्य कर्ज; वरिष्ठ स्तरावरून चौकशी

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्या आरोपावरुन बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याचे समजते. कारवाईची चौकशी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कारवाई अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले़ कोणावर अन्याय होता कामा नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.

Web Title: State Bank of India's external debt; Senior level inquiries