एकवीरा गडावर अत्याधुनिक दर्शनरांग
By Admin | Updated: March 19, 2015 22:40 IST2015-03-19T22:40:40+5:302015-03-19T22:40:40+5:30
भाविकांना त्रासमुक्त दर्शनाचा लाभ घेता यावा, रांगेत असतानाच गाभाऱ्याचे दर्शन व्हावे, यासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक दर्शनरांग उभारली आहे.

एकवीरा गडावर अत्याधुनिक दर्शनरांग
लोणावळा : भाविकांना त्रासमुक्त दर्शनाचा लाभ घेता यावा, रांगेत असतानाच गाभाऱ्याचे दर्शन व्हावे, यासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक दर्शनरांग उभारली आहे. याचे उद्घाटन मंगळवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष माजी अनंत तरे होते.
देवीची चैत्र यात्रा २५ मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता यावे, यासाठी ट्रस्टने अत्याधुनिक दर्शनरांग बनवली आहे़ त्यामध्ये बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, कूलर, एलईडी दिवे, पंखे, ग्रेनाइट फ्लोअरिंग, तसेच वर्षभरातील देवीचे कार्यक्रम पाहता यावेत, यासाठी तीन मोठे एलईडी संच, सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर, मंदिरात जाताना पाय धुण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वेहेरगावचे माजी सरपंच स्वर्गीय शंकरराव पडवळ यांनी देवीच्या पाच पायरी मंदिराजवळील जागा देवस्थानाला वाहनतळासाठी दिली होती़ त्याप्रित्यर्थ ‘स्वर्गीय शंकरराव श्यामराव पडवळ वाहनतळ’ असे नामकरण केले आहे. या फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळुराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, श्रीमती पार्वताबाई पडवळ, युवराज पडवळ, जयद्रं केणी, अंकुश देशमुख, जयवंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते़ पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल स्थानिक विश्वस्तांच्या वतीने तरे यांचा सत्कार झाला़ या वेळी युवराज पडवळ यांनी त्यांना तलवार भेट दिली़ (वार्ताहर)