शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ATS कडून युपीतील एकास अटक; लष्कर- ए- तोएबाशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:10 IST

लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध, आरोपीला युपीतून अटक

पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तरप्रदेशातून एकास अटक केली. लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन यापूर्वी एटीएसने पुण्यातील दापोडी तसेच काश्मिरमधून दोघांना अटक केली होती. इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लष्कर ए तोएबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद महंमद (वय २८, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

जुनैद, आफताब यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत इनामूल हक लष्कर ए तोएबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. त्यानंतर हक याला अटक करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस