शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विश्वकोश अद्ययावतीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 16:34 IST

सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्दे२३ पैकी २० खंड प्रकाशित : ४६ ज्ञान मंडळांकडून ८५० नव्या नोंदीविविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा शासनातर्फे निर्णय

पुणे : विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्यशाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावतीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये ४६ ज्ञान मंडळे स्थापन करण्यात आली असून, ज्ञान मंडळाकडून आजमितीला विज्ञान व मानव्यशाखेमधील नव्याने ८५० नोंदी केल्या आहेत .सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. हे अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, लॉ कॉलेज पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, रचना संसद, गायन समाज देवल क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, प्रभात चित्र मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, रसायन तंत्रज्ञान संस्था, मराठी विज्ञान परिषद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,  अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, विश्वेश्वरय्या प्रौद्योगिकी संस्थान नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अमरावती विद्यापीठ, विज्ञान भारती अशा विद्यापीठांमध्ये व शैक्षणिक-संशोधन संस्थांमध्ये सुमारे ४६ ज्ञान मंडळे स्थापन केली आहेत. या ज्ञान मंडळांचे मानव्यविद्या व विज्ञान व तंत्रज्ञान शाखा असे दोन विभाग केलेले असून, निर्मिती मंडळातील सदस्य त्यांच्याशी संबंधित विषयांच्या ज्ञान मंडळांचे विषय पालक म्हणून काम पाहतात. डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. नीरज हातेकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. सुहास बहुलकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे असे विषयतज्ज्ञ  मराठी विश्वकोशाच्या सदस्यपदी लाभले असून, अनेक ज्ञान मंडळांचे पालकत्व यांच्याकडे सुपूर्द केले आहे.विश्वकोशीय लेखनाची पद्धत व मांडणी ज्ञान मंडळांतील लेखकांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक प्रभावीपणे  नोंद-लेखन करता यावे, यासाठी नोंदलेखन कार्यशाळांचे विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने केले जाते. आपल्या विषयाशी निगडित विश्वकोशामध्ये विषयांच्या अनुषंगाने नवीन नोंदींचे भर घालणे अशा स्वरुपात ज्ञान मंडळे कार्य करतात. राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप करंबळेकर म्हणाले, विश्वकोशातील विषय हा सामान्य वाचक, विद्यार्थी, जिज्ञासू यांपर्यंत समर्पक आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचावा, याची काळजी विश्वकोश आणि ज्ञान मंडळे घेतात. नोंदींचे लेखन, समीक्षण-संपादन आणि प्रकाशन या पूर्ण प्रक्रियेला ज्ञान मंडळांच्या स्थापनेमुळे अधिक गती प्राप्त झाली आहे.राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ ज्ञान मंडळांनी आपल्या विषयांतर्गत कोणत्या नोंदी येतील, याची सविस्तर नोंद यादी तयार केलेली असून, या यादीनुसार नोंदींचे लेखकांमध्ये वाटप होते. लिहिलेल्या नोंदींवर आशय व भाषेच्या दृष्टीने संस्करण होऊन नोंद अंतिम केली जाते. 

...............................ज्ञान मंडळांमध्ये व विश्वकोशामध्ये होणाºया नोंदींचे प्रकाशन त्या-त्या ज्ञान मंडळांच्या संकेतस्थळांवर होणार असून, या संकेतस्थळांची निर्मिती प्रक्रियाधीन आहे. संकेतस्थळांवर ज्ञान मंडळांची प्रस्तावना, विषयांतील घटकांप्रमाणे होणारी वर्गवारी आणि शोध अशा रुपात ज्ञान मंडळे लोकांसमोर येतील. त्यादृष्टीने ज्ञान मंडळांनी प्राथमिक तयारी केलेली आहे.-  डॉ. दिलीप करंबळेकर, अध्यक्ष, 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकliteratureसाहित्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार