महामार्गावरील धोकादायक चेंबरच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:47 IST2019-02-21T00:47:25+5:302019-02-21T00:47:41+5:30

पाटस टोल प्रशासनाने घेतली दखल : वाहनचालकांना दिलासा

Starting the dangerous chamber work on the highway | महामार्गावरील धोकादायक चेंबरच्या कामाला सुरुवात

महामार्गावरील धोकादायक चेंबरच्या कामाला सुरुवात

रावणगाव : रावणगाव (ता. दौैंड) येथील महामार्गालगतच्या धोकादायकरीत्या उघड्या असलेल्या चेंबरचे काम पाटस टोल प्रशासनाने त्वरित सुरू केले आहे. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. १४) ‘महामार्गालगतच्या कॅनॉलवर धोकादायक चेंबर, रावणगावनजीक अपघाताची शक्यता, टोलप्रशासनाचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पाटस टोल प्रशासनाने रावणगाव येथील महामार्गालगतच्या धोकादायकरीत्या उघड्या असलेल्या चेंबरचे काम त्वरित सुरू केले आहे.

रावणगाव येथील शिर्सुफळ तलाव कालव्याच्या कॅनॉलवरील चेंबर अनेक दिवसांपासून उघडे असल्याने त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती. त्या बातमीची दखल घेऊन हे काम सुरू करण्यात आले. याबाबत रावणगाव ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानून विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यामध्ये ‘लोकमत’ नेहमीच अग्रेसर असल्याचे म्हटले आहे.
 

Web Title: Starting the dangerous chamber work on the highway

टॅग्स :Puneपुणे