शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 20:20 IST

सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला.

ठळक मुद्देदोघेही उच्चशिक्षित:  पत्नीला नांदविण्यावरून झाले होते वाददरमहा १० हजार रुपये पोटगी आणि पाच हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च देण्याचे दिले होते आदेश

पुणे : सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. त्यानुसार पत्नीला दरमहा पोटगी देखील मिळू लागली. मात्र, त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी दोघांच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नामुळे आणि समुपदेशामुळे संपत आलेले नाते पुन्हा उभारी घेवू लागले आहे.     प्रितम आणि प्रमिला असे या दाम्पत्याचे नाव. दोघेही उच्चशिक्षत. प्रितम हा एका खासगी कंपनीत कामाला होता तर प्रमिला हाऊस वाईफ. एप्रिल २०१६ त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. दोघेही एकुलते एक असल्याने पालकांनी त्यांना अगदी लाडात वाढवले. प्रितम हा खेड्यात वाढलेला होता. तर प्रमिला ही लहानपनापासूनच शहरातच राहिलेली. त्यामुळे दोघांच्या विचारात काहीसा फरक होता. लग्न झाल्यानंतर दोघांचेही पहिले काही दिवस आनंदात गेले. मात्र, प्रपंचाला सुरुवात झाल्यानंतर प्रमिलाचा सासरच्यांकडून मानसिक छळ होऊ लागला. घरातील कोणतीही वस्तू खराब झाली किंवा वाया गेल्यास ती माहेरहून आणायची असे प्रमिलाला सांगितले जाऊ लागले. सासरचा अजब त्रास तिला सहन होईना. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यानंतर तिला सासरच्यांकडून घर सोडून जाण्यासाठी दबाव आणला जावू लागला. त्यामुळे नांदणे अशक्य झाल्याने शेवटी तिने माहेर गाठले. माहेरी गेल्यानंतर दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर तिच्या आई वडिलांनी कायदेशीर मदत घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. मिनाक्षी डिंबळे यांच्यामार्फ त कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला.       दोघांमधील वाद मिटविण्यासाठी दोघांच्याही कुटुंबियांच्या बैठकाही झाल्या. मात्र त्यातून काही मार्ग निघाला नाही. त्यात मी तिला नांदवणार नाही, या भूमिकेवर प्रतिम ठाम होता. त्यामुळे प्रमिलाने दाखल केलेल्या पोटगीच्या खटल्यावर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी तिला दरमहा १० हजार रुपये पोटगी आणि पाच हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शैलजा सावंत यांनी दिले. त्यानंतर पोटगी वसूलीचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र यादरम्यान डिंबळे यांनी पुन्हा दोघांचे सुर जुळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दोघांचे समुपदेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला. त्यानंतर वेगळे घर घेऊन  नव्याने संसार सुरू केला आहे. व्यवसायाचा एक भाग म्हणून एक घर आणि संसार वाचविता आले याचा आनंद असल्याची भावना अ‍ॅड. डिंबळे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयmarriageलग्नDivorceघटस्फोटadvocateवकिल