‘लोकमत शॉपिंग उत्सव’ २०१६ चा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 01:46 IST2016-02-06T01:46:42+5:302016-02-06T01:46:42+5:30

पुणेकरांना घसघशीत डिस्काऊंटमध्ये विविध वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी लोकमत सखी शॉपिंग उत्सवाचे येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन आयोजन करण्यात आले

Start of 'Lokmat Shopping Festival' 2016 | ‘लोकमत शॉपिंग उत्सव’ २०१६ चा प्रारंभ

‘लोकमत शॉपिंग उत्सव’ २०१६ चा प्रारंभ

पुणे : पुणेकरांना घसघशीत डिस्काऊंटमध्ये विविध वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी लोकमत सखी शॉपिंग उत्सवाचे येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. अर्नेस्ट ग्रुप प्रस्तुत हे प्रदर्शन आहे.
लोकमत एक्झिबिशन्सच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत भरणार असून सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अर्नेस्ट ग्रुपचे संचालक महांतेश पालरेषा, विनय चुडिवाल, आकाश शहा, गुणवंत जाधव आणि केके रिअ‍ॅलिटीचे संचालक झकी खान यांच्या उपस्थितीत झाले.
गृहोपयोगी वस्तूंचे विविध प्रकार एकाच छताखाली या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रदर्शनाच्यानिमित्ताने वस्तूंवर सूटही दिली जाणार आहे.
या प्रदर्शनात नावीन्यपूर्ण होम अ‍ॅप्लायन्सेस आणि युटिलिटीज उत्पादने, फर्निचर आणि डेकॉर यांचे आकर्षक डिझाइन्स असून या उत्पादनांवर उत्तम आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. तसेच किचन्स, किचनवेअर, गॅस स्टोव्हज, हॉब्ज, चिमणीज, तसेच दुचाकी व चारचाकी गाड्यांची दालने, महिला, पुरुष व मुलांसाठी ड्रेस मटेरिअल उपलब्ध आहेत. याबरोबर फॅशन व लाइफस्टाइलच्या वस्तूंसाठी वेगळे दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये गारमेंट्स, ज्वेलरी, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर, पर्सेस, कॉस्मेटिक्स, ब्युटी केअर आदी उत्पादने असणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Start of 'Lokmat Shopping Festival' 2016