शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

नाताळाला उत्साहात प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:41 IST

पुणे शहरात मंगळवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमधून नाताळाच्या निमित्ताने मध्यरात्रीची उपासना (वॉचनाईट सर्व्हिस) करण्यात आली.

पुणे : शहरात मंगळवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमधून नाताळाच्या निमित्ताने मध्यरात्रीची उपासना (वॉचनाईट सर्व्हिस) करण्यात आली. यातून प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.\सिटी चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट मॅथ्यू चर्च, पंचहौद येथील पवित्रनाम देवालयात मध्यरात्रीची उपासना करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. याबरोबरच सर्व चर्चमधून येशु ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे (गवानी) उभारण्यात आले आहे. तसेच, सर्व चर्चमधून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सर्व चर्चमधून आनंदगीते (कँरल सिंगिंग) गाण्यात आली. त्यातून ख्रिस्तोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चनधर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशूंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.ख्रिश्चन बांधव या सणाला महत्त्व देतात. कारण, जिझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सण आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ- क्राइस्ट्स मास अर्थात येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना.कॅम्प परिसरातील वाहतुकीत बदलख्रिसमस सणानिमित्ताने कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते़ त्यामुळे या भागातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मंगळवारी या परिसरातील वाहतुकीत सायंकाळ ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बदल करण्यात आला आहे़गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रोड व पूलगेटकडे जाणाऱ्या रोडवरील वाय जंक्शनवरुन एमजी रोडकडे येणारी वाहतूक १५ आॅगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे़इस्कॉन मंदिर चौकातून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन ती एसबीआय हाऊस चौकाकडे वळविण्यात येईल़ व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारीवाहतूक बंद करुन ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल़इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन ती इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल़ सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक बंद करुन ती ताबुत स्ट्रीट रोड मार्गे वळविण्यात येईल़वाहनचालकांनी या पर्यायी रस्त्यांचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :ChristmasनाताळPuneपुणे