शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

आंतरराष्ट्रीय शाळांसाठी निकष जाहीर; पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळा निवडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:58 PM

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने सुधारीत निकष जाहीर केले आहेत.

ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत शिक्षण विभागाचा १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णयअर्ज करण्यासाठी विद्या प्राधिकरणामार्फत स्वतंत्र लिंक केली जाणार

पुणे : राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने सुधारीत निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार असून या शाळा उर्वरित ९० शाळांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. या शाळा अनुक्रमे ‘ओजस’ आणि ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखल्या जातील.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत शिक्षण विभागाने राज्यात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांपासून या शाळांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरूवारी शासन निर्णयाद्वारे पुन्हा सुधारीत निकष व प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ओजस शाळांमधून मुंबई व पुणे शहराला वगळण्यात आले आहे. या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळांचे उत्तम उदाहरण असणाºया शाळा पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. तेजस शाळांसाठी सर्व महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी १ व जिल्हाच्या ग्रामीण भागातील किमान २ शाळांची निवड केली जाईल. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी २ शाळांची निवड केली जाणार आहे. या शाळा प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१८ पासून सुरू होतील. तर मार्च २०२१ आणि २०२२ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय चाचण्यांना सामोºया जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी विद्या प्राधिकरणामार्फत स्वतंत्र लिंक केली जाणार असून त्यावर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविल्या जाणाºया अनुदानित शाळांकडून नाव नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शाळांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती शाळांची निवड करेल.

शाळा निवडीचे निकष -१. शाळांचे नेतृत्व (३० टक्के)२. शिक्षकांची गुणवत्ता (२५ टक्के)३. शाळेचे ध्येय (२५ टक्के)४. प्रशासकीय मदत (२५ टक्के) 

विभागनिहाय ओजस व तेजस शाळांची संख्याविभाग         ओजस         तेजस    कोकण          १                 ९पुणे               १                 ९औरंगाबाद    २                 १८नाशिक         २                १८अमरावती     २                १८नागपूर         २                 १८एकूण           १०               ९० 

टॅग्स :educationशैक्षणिकMaharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळ