शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक

By नितीश गोवंडे | Updated: December 22, 2023 12:31 IST

प्रकाश पांडुरंग मोंडकर (३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.....

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयाची चर्चा संबंध देशभर होत आहे. त्यातच ससून रूग्णालयातून बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी शिक्के चोरणाऱ्या एकाला रुग्णालय प्रशासनाने पकडून बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याने डॉक्टर आणि कर्मचारी यांची नजर चुकवून डॉक्टरांचे शिक्के चोरले, या शिक्क्यांच्या आधारे त्याने बनावट मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले.प्रकाश पांडुरंग मोंडकर (३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा. ओगलेवाडी, कराड, सातारा) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (२६, रा. गुंजन सोसायटी, रास्तापेठ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ दामशेट्टी हे ससून रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून वार्ड नंबर ७४ या ठिकाणी आरएमओ म्हणून नोकरीस आहेत. वैद्यकीय अधीक्षक किरणकुमार जाधव हे त्यांचे प्रमुख म्हणून काम करतात. १४ डिसेंबर रोजी ससून रूग्णालयातील वॉर्ड नंबर ७४ या ठिकाणी काम करत असताना डॉ. जाधव हे रुग्णांच्या केस पेपरवर सही करत होते. त्यावर शिपाई अरूण मांडवेकर हे सरांच्या सही खाली त्यांचा शिक्का मारण्याचे काम करत होते. त्याच दिवशी दुपारी डॉ. जाधव यांनी पेशंटच्या केस पेरवर सही केली परंतु, मांडवेेकर यांनी शिक्का शोधला असता त्यांना तो सापडला नाही. याबाबत त्यांनी लगेचच डॉ. जाधव यांना सांगितले. त्यावेळी मांडवेकर यांनी शेवटी आलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटी आलेल्या व्यक्तीने ते शिक्के खिशात घालून नेल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीत कैद झालेली व्यक्ती बुधवारी डॉ. जाधव यांची सही घेण्यासाठी आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव मोंडकर असल्याचे सांगितले. तसेच त्याची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत त्यांना दोन शिक्के सापडले.

दरम्यान त्याला ताब्यात घेऊन त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एका पेपरवर प्रकाश मोंडकर नावाचे फिटनेस तपासल्याची नोट आणि त्यावर डॉ. प्राजक्ता बहिलूम यांच्या नावाचा शिक्का मारून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे निदर्शनास आल्याने मोंडकर सह त्याच्या साथीदारावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsasoon hospitalससून हॉस्पिटल