शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यावर ठिय्या

By admin | Updated: August 13, 2015 04:36 IST

पोलीस कोठडीत मारहाणीतच अजय भोसले या आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत बुधवारी त्याच्या नातेवाइकांनी खेड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला.

राजगुरूनगर : पोलीस कोठडीत मारहाणीतच अजय भोसले या आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत बुधवारी त्याच्या नातेवाइकांनी खेड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला. मारहाणीस कारणीभूत पोलिसांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.या घटनेमुळे आज दिवसभर खेड पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण होते. पोलिसांची जादा कुमक मागवून मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता. भोसले याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आणि पोलिसांनी पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप मृताची पत्नी व बहिणीने केला. त्यामुळे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या नातेवाइकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ससून येथेच असलेल्या मृताचे विच्छेदन दुपारपर्यंत झाले नव्हते. अखेर अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईक मृताच्या विच्छेदनास तयार झाले.पोलीस अधिकारी मात्र भोसले याच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याला आम्ही रुग्णालयात नेले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. आरोपीला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही, उलट त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आम्ही तीनही दिवस त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे, असा दावा पोलीस करीत आहेत. काल दुपारी त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला चांडोली रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात यावे, असे सांगितल्यावरून त्याला पुढे हलविण्यात आले. पण तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्यास पोलिसांकडून सीआयडीकडे तपास वर्ग करण्यात येतो. त्याप्रमाणे आज सकाळी पुणे सीआयडीच्या पोलीस अधीक्षक पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दिवसभर येथे तणावपूर्ण वातावरण होते. आळेफाट्यापासून चाकणपर्यंतचे पोलीस तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर नातेवाईक अंत्यविधीसाठी तयार झाले. पण रात्री उशिरापर्यंत मृतदेह राजगुरुनगरला आला नव्हता. (वार्ताहर)‘‘या घटनेत सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारींची चौकशी केली जाईल. पुढील तपास सीआयडीकडून केला जाणार आहे. त्यामुळे या तपासात पोलिसांचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही.’’ तानाजी संभाजी चिखले, अपर पोलीस अधीक्षक