शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ST Workers Strike: एसटी बंदमुळे रेल्वेकडे धाव पण तिथेही पदरी निराशाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 19:08 IST

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवाशी नीरा बस स्थानकातून ये - जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे (msrtc strike, st strike)

नीरा(पुणे): दिपावलीच्या सुट्टीनंतर आता शहरातील चाकरमानी परतीच्या प्रवासावर आहेत. त्याच एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शनिवार, रविवार व सोमवारी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यातच फक्त कोयना एक्स्प्रेसच सध्या सुरु असल्याने नीरा रेल्वे स्टेशनला प्रचंड गर्दी होत आहे. आज कोयना एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने नीरा व परिसरातील प्रवाशांना गाडीत चढणेही मुश्किल झाले होते.

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवाशी नीरा बस स्थानकातून ये - जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे. एसटी बसला पर्याय म्हणून गेली तीन दिवस मोठ्या प्रमाणावर प्रवाशी रेल्वेने प्रवास करताना दिसत आहेत. नीरा रेल्वे स्टेशन वरून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत.

दिवसभरात पुण्याला व साताऱ्याला जाण्यासाठी दोन पॅसेंजर व तीन एक्स्प्रेस असतात. पण सध्या फक्त दिवसाची कोयना एक्सप्रेस तर नागपूर येथे जाण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे. गेली दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने नीरा रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नात सरासरी पंधरा टक्के वाढ झाली असल्याचे प्रभारी सहाय्यक स्टेशन प्रमुखांनी सांगितले.

दिपावलीच्या सुट्टीनंतर सैनिकांसह इतर चाकरमानी परतीच्या प्रवासावर आहेत. पण एसटी कामगारांचा संप व एकच एक्स्प्रेस सुरु त्यातही फक्त रिजर्वेशन तिकीट त्यामुळे काही लोक विना तिकीट प्रवास करत आहेत, तर काही तिकीट खिडकीवर विनंती करुन तिकीट मागत होते. तिकीट न मिळाल्याने काही प्रवाशांनी रस्त्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंद केले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेST Strikeएसटी संपDiwaliदिवाळी 2021pune railway stationपुणे रेल्वे स्थानक