शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गामुळे एसटी, ट्रॅव्हल्सचा बुडतोय कोट्यावधींचा महसुल; ऐन हंगामात सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:27 IST

परीक्षा संपल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरू होतात. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची एसटी व खासगी ट्रॅव्हल्सला गर्दी होते.

ठळक मुद्दे पुण्यात राज्यासह परराज्यातून आलेल्यांची संख्या मोठीएसटीसह खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडूनही हंगामाचे नियोजन उत्पन्नात दररोज २५ ते ३० लाख वाढ होऊन सव्वा कोटीपर्यंत

पुणे : उन्हाळी सुट्टया म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व खासगी ट्रॅव्हल्सच्या महसुलात अधिकची भर टाकणारा हंगाम. पण कोरोना संसर्गामुळे वाहतुक सेवा ठप्प असल्याने दररोज कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी-अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळेलही पण खासगी ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांना मात्र आधार राहिलेला नाही.शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरू होतात. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची एसटी व खासगी ट्रॅव्हल्सला गर्दी होते. पुण्यात राज्यासह परराज्यातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रासह खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात जाण्यासाठी गर्दी होत असते. या सुट्यांमध्ये अनेकजण सहली, प्रवासाचे बेत आखतात. त्यानुसार एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडूनही हंगामाचे नियोजन केले जाते. जादा बस सोडणे, विविध आकर्षक सवलती दिल्या जातात. पण यंदाचा हंगाम कोरोना संसर्गामुळे ठप्प झाला आहे. मागील एक महिन्यापासून एकही बस जागेवरून हलली नाही.एसटीच्या पुणे विभागाकडून दर उन्हाळ्यात १५ एप्रिलनंतर जागा गाड्यांचे नियोजन केले जाते. नियमित गाड्यासह एकुण हजारावर गाड्या सोडण्यात येतात. तसेच बाहेरून पुण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची संख्याही ४०० ते ५०० एवढी असते. हंगामाच्या काळात प्रवासी उत्पन्नात दररोज २५ ते ३० लाख वाढ होऊन सव्वा कोटीपर्यंत जाते, अशी माहिती विभागाच्या वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.--------------पुण्यातून दररोज सरासरी १६०० बस ये-जा करतात. रोजचे प्रत्येक गाडीचे उत्पन्न सुमारे २० हजार एवढे असते. त्यानुसार दररोज ३ कोटींहून अधिक उलाढाल होत होती. पण सध्या सर्वच ठप्प आहे. एकीकडे महसुल मिळत नाही, तर दुसरीकडे बँका हप्त्यासाठी थांबत नाहीत. कर्मचाºयांना सध्या तात्पुरते पैसे दिले आहेत. पण पुढील महिन्यात कुठून पैसे देणार, हा प्रश्न आहे.- प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सpassengerप्रवासी