शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराच्या हद्दीबाहेरून एसटी सुरू ; आठवडाभर ५० बसमार्फत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:48 IST

शहराच्या हद्दीत येण्यार परवानगी नसल्याने हद्दीबाहेरून हडपसर व वाघोली येथून बस सुरू

ठळक मुद्देप्रवाशांच्या प्रतिसादानुसार बस व मार्ग वाढविण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्द वगळून जिल्ह्यात काही प्रमुख मार्गांवर सोमवार (एसटी)पासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने पुढील आठवडाभर ५० बसमार्फत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा सुरू राहील. त्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बस व मार्ग वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात एसटी महामंडळाची बससेवा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. जिल्ह्याच्या हद्दीपासून बस सोडण्यात येत नाही. पुणे शहर रेड झोनमध्ये असल्याने सुरूवातीला केवळ ग्रामीण भागात बस सुरू करण्यात आल्या होत्या. पण ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागल्याने ही सेवाही काही दिवस बंद करण्यात आली होती. आता पुन्हा सोमवार (दि. १५) पासून या भागात ही सेवा सुरू झाली आहे. सध्या केवळ काही ठराविक मार्गांवर ५० बसमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्र तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांसाठी प्रामुख्याने ही सेवा असेल. तसेच पुण्यात शासकीय व खासगी नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे हडपसर व वाघोलीपर्यंत बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी प्रत्येक बसला दिवसभरात अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील आठवडाभर प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू राहील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मार्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.---------------बस प्रवासासाठी दक्षता- सुरक्षित अंतरासाठी केवळ २० प्रवाशांना प्रवेश- ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना प्रवेश नाही- प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर- बस प्रवासासाठी मास्क बंधनकारक---------------एसटीचे काही मार्ग -- हडपसर ते बारामती- वाघोली ते शिरूर- चाकण ते आळेफाटा- इंदापुर ते बारामती- सासवड ते कापुरहोळ- राजगुरूनगर ते भिमाशंकर----------------------शहराच्या हद्दीत येण्यार परवानगी नसल्याने हद्दीबाहेरून हडपसर व वाघोली येथून बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ५० बस मार्गावर असून टप्प्याटप्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस वाढविल्या जातील. पुढील आठवडाभर याबाबत चाचपणी केली जाईल. बसमध्ये सर्व दक्षता घेतल्या जात आहेत.- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग----------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सpassengerप्रवासी