भोर एसटी आगाराकडून पुणे, मुंबईसह ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:15+5:302021-06-09T04:13:15+5:30
लाॅकडाऊनमुळे एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. मात्र ...

भोर एसटी आगाराकडून पुणे, मुंबईसह ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू
लाॅकडाऊनमुळे एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती.
यामुळे भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. मात्र आता लाॅकडाऊनमध्ये सूट दिल्यामुळे भोर-पुणे मार्गावर भोर-परेल व भोर-पुणे-सोलापुर मार्गावर व ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी सोमवार ७ जूनपासून बससेवा सुरू करण्यात आली आहे.
बस सुटण्याची वेळ भोर - स्वारगेट,सकाळी ०६ .४५ वाजता.
सकाळी ०७ .४५ वाजता, सकाळी ०८.४५ वाजता,सकाळी १० १५ वाजता, सकाळी ११.१५ वाजता,दुपारी १२ .१५ वाजता.
दुपारी १२ .४५ वाजता, दुपारी १४.१५ वाजता,दुपारी १६.३० वाजता सायंकाळी १८ वाजता. भोर परेल, सकाळी ९ .४५ वाजता.परेल भोर सकाळी ५ .४५,भोर-पुणे-सोलापूर,सकाळी १०.४५ वाजता सोलापूर-पुणे भोर सकाळी ५.४५.
भोर चिखलगाव धोंडेवाडी- मार्ग टिटेघर,सकाळी ०७ .३० वाजता,भोर धोंडेवाडी,दुपारी १२ .३० वाजता व १६ वाजता.
भोर कोर्ले-सकाळी ९ वाजता.दुपारी १३ वाजता.व सायंकाळी १६ .३०,भोर कारी.सकाळी ८ वाजता.व दुपारी १३ वाजता.
भोर-म्हसर सकाळी १० वाजता.दुपारी १५ वाजता.भोर-महुडे
सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजता.
दरम्यान सुरू केलेल्या एसटी फेऱ्या प्रवाशांचा नियमित प्रवास पाहून कायम ठेवण्यात येणार आहे.तर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल व प्रवाशांच्या मागणीनुसार भोर - पुणे फेरी सुरू करण्याता येईल, असे आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.