एसटी च्या सुरक्षा रक्षकांना ८ महिन्यांपासून वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST2021-05-14T04:12:10+5:302021-05-14T04:12:10+5:30
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगार, कार्यशाळा, कार्यालये आदी ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील आठ महिन्यांपासून ...

एसटी च्या सुरक्षा रक्षकांना ८ महिन्यांपासून वेतन नाही
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगार, कार्यशाळा, कार्यालये आदी ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील आठ महिन्यांपासून एसटीने वेतन दिलेले नाही. राज्य भरात जवळपास असे १३०० कर्मचारी असून त्यांच्या वेतनापोटी १० कोटी रुपये एसटी प्रशासन देणे आहे.
एसटी महामंडळाला जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सदस्यकडून सुरक्षा पुरविली जाते. एसटी च्या पुणे विभागात जवळपास १३० सुरक्षा कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना ऑक्टोबर २०२० पासून वेतन मिळाले नाही. सुरक्षा रक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कडूनच दर महा आगाऊ रक्कम म्हणून १० हजार रुपये दिले जात आहे. मात्र एसटीकडून एकही रुपया मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट
आम्ही एसटी साठी सेवा बजावत आहोत. त्यामुळे एसटीने आमचे वेतन देणे गरजेचे आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून आमच्या सुरक्षा रक्षकांना वेतन मिळाले नाही. आम्ही वारंवार एसटी ची पत्र व्यवहार केला आहे. मात्र गाड्या बंद असल्याने आमचे उत्पन्न ही घटले असल्याचे ते सांगतात.
- शंभू खंडाळे, प्रदेश उपाध्यक्ष, सुरक्षा रक्षक महासंघ संलग्नित भारतीय मजदूर संघ, पुणे