एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

By Admin | Updated: June 17, 2014 02:45 IST2014-06-17T02:45:51+5:302014-06-17T02:45:51+5:30

येथील राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी चंद्रकांत सर्जेराव जमदाडे (वय ५६) यांनी रात्री कुंभारगाव एसटीवर मुक्कामी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

ST employee commit suicide | एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

भिगवण : येथील राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी चंद्रकांत सर्जेराव जमदाडे (वय ५६) यांनी रात्री कुंभारगाव एसटीवर मुक्कामी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
भिगवण परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. २० वर्षांपासून याच गाडीवर जमदाडे चालक म्हणून कार्यरत असल्याने परिसरातील अनेक प्रवाशी व विद्यार्थ्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते जुळले होते. घटना समजताच अनेकांनी कुंभारगाव येथे धाव घेतली. कुंभारगाव येथे मुक्कामी असताना रात्री जेवणानंतर शाळेच्या आवारातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती भिगवण पोलिसांत गाडीचे वाहक दत्ता कुंडलिक शिंदे यांनी दिली आहे. गळफास घेण्यापूर्वी चंद्रकांत जमदाडे यांनी विषारी औषध प्राशन केले असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे सहायक फौजदार अरुण रासकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: ST employee commit suicide