शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:49 IST

एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील.

ठळक मुद्देएसटीच्या नुकसानीचा एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा सुरू

पुणे : चाकण येथील घटनेने सतर्क झालेल्या एसटी महामंडळाने बुधवारी (दि. १) औरंगाबाद बंदच्या पार्श्वभुमीवर या मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील. दरम्यान, मंगळवारी नाशिक मार्गावरील एसटीची वाहतुक पुर्णपणे ठप्प होती. बुधवारीही परिस्थितीचा अंदाज घेवून बस सोडल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या १३ गाड्या जळाल्या असून दोन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच नाशिक मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याने लाखो रुपयांचे उत्पन्नही बुडाले. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता मंगळावारी चाकण मार्गे नाशिक, भीमाशंकर तसेच शिर्डीला जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या. या मार्गावरून दररोज शिवाजीनगर येथून ३३ व नाशिक येथून ३३ तर भीमाशंकरला एकून ३० आणि शिर्डीला पाच फेऱ्या होत्या. नाशिक मार्गाचे दररोजचे उत्पन्न सुमारे ३५ लाख एवढे असते. सोमवारी दुपारपर्यंतच या मार्गावर वाहतुक सुरू राहिल्याने जवळपास निम्म्याहून अधिक महसूल बुडाला आहे. औरंगाबाद येथे बुधवारी बंद पुकारण्यात आल्याने प्रशासनाने या भागात जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच जुन्नर तालुक्यातही बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील बससेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्याठिकाणी बंद असेल तेथील बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिक मार्ग वगळता अन्य सर्व मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.-------------चाकण येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी या मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इतर मार्गावर बससेवा सुरू होती. बुधवारी औरंगाबाद व जुन्नर बंद असल्याने या भागातील सेवा बंद ठेवली जाईल. चाकण येथील घटनेत एसटीच्या नुकसानीचा एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे. - यामिनी जोशी, पुणे विभाग नियंत्रक

टॅग्स :PuneपुणेAurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा