शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील एसटी बससेवा सुरू ; शहर, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणखी काही दिवस बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:11 IST

शुक्रवारपासून बससेवेला हिरवा कंदील मिळाला असला तरी पण प्रवासासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना दिला जाणार नाही प्रवेश; मास्क घालणे बंधनकारक पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी ही बससेवा सुरूस्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड आगारातून बससेवा सुरू करण्यात आलेली नाही.

पुणे : लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून थांबलेली एसटी बसची चाके शुक्रवार (दि. २२) पासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धावू लागली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील बसची ये-जा मात्र आणखी काही दिवस ठप्पच राहणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली असली तरी प्रवासीच नसल्याने बस रिकाम्या धावत होत्या.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर पुण्यातून ये-जा करणाऱ्या एसटी महामंडळाची बससेवा दोन महिन्यांपुर्वी बंद करण्यात आली होती. मागील १५ दिवसांपासून केवळ परराज्यात जाणारे मजुर तसेच परराज्यातून येणाऱ्या महाराष्ट्रातील मजुरांसाठी त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही दिवसांपुर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यानुसार दोनच दिवस ही सेवा सुरू राहिली. पण जिल्हांतर्गत बससेवाला विरोध होत असल्याने ती बंद करण्यात आली. आता पुन्हा शुक्रवारपासून बससेवाला हिरवा कंदील मिळाला आहे. पण त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. मास्क घालणे बंधनकारक असेल. बसच्या क्षमतेच्या केवळ निम्मेच प्रवासी घेतले जातील आदी अटींचा समावेश आहे. या दक्षता घेऊन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी ही बससेवा सुरू झाली आहे.याविषयी 'लोकमत' ला माहिती देताना एसटीच्या पुणे विभाग वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी म्हणाल्या, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील भाग रेड झोनमधे असल्याने येथील स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड आगारातून बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. तसेच तळेगाव व बारामती एमआयडीसी आगाराची सेवाही बंद राहील. मात्र इंदापुर, बारामती, शिरूर, राजगुरूनगर, सासवड यांसह उर्वरीत आगारांची सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळपासूनच बस धावत आहेत. नेहमी गर्दी असलेल्या मार्गांना प्राधान्य दिले जात आहे. त्या मार्गांवरही प्रवासी नाहीत. पण या मार्गावरही प्रवासी नाहीत. त्यामुळे बस रिकाम्या धावत आहेत. पण तरीही काही ठराविक मार्गांवर बस सुरू राहतील.------------------पुण्यात ये-जा नाहीपुणे व पिंपरी चिंचवड रेड झोनमध्ये असल्याने दोन्ही शहरांतून एकही बस आगारातून बाहेर पडणार नाही. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातूनही एकही बस पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होणार नाही. त्यामुळे एसटी बससेवा सुरू झाली असली तरी दोन्ही शहरांतील नागरिकांना त्याचा फायदा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.----------

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपroad transportरस्ते वाहतूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस