शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी, एसटी घुसली दुकानात, २१ जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:00 IST

अंबड - पुणे एसटीबसच्या चालकाला झोप लागल्याने बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून एका दुकानात घुसली.

ठळक मुद्दे पुणे-नगर मार्गावर सणसवाडी येथे अपघातरुग्णालयाची बिले जवळील एसटी डेपोमध्ये देऊन बिले घेण्याचे आवाहन

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील सणसवाडी (ता. शिरूर) याठिकाणी गुरुवारी पहाटे अंबड - पुणे एसटीबसच्या चालकाला झोप लागल्याने बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून एका दुकानात घुसली. दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. २१ प्रवासी जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , बसचालक श्यामराव बबन जाधव (रा. दुसरेबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) व वाहक भगवान भीमराव मसुरे (रा. राममंदिर गल्ली, अंबड) हे दोघे देखील जखमी झाले आहे. तर याबाबत राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. एसटी बस (एमएच २०, बीएल ३०६३) चालक जाधव यांचा झोप लागल्याने ताबा सुटला आणि बस रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. पुढे जाऊन आबासाहेब दरेकर यांच्या यश अ‍ॅटोमोबाईल्स दुकानात घुसली. बसचा वेग जास्त असल्यामुळे दुकानाच्या मागील बाजूस असलेली भिंतदेखील ढासळली, दुसरी ३0 फुटांची भिंतदेखील सरकली गेली.      घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस नाईक संजय ढमाल, विजय गाले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जखमींना तातडीने शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांची प्रकृतीदेखील गंभीर आहे. यामध्ये शिवजय गंगाराम माने (वय ६६), मनोज मदन बोरावकर (वय ३५), आशाबाई शिवदास माने (वय ६०, सर्व रा. चिखली, पुणे), तुकाराम पंढरीनाथ कुमते (वय ७०), नानाबाई तुकाराम कुमते (वय ६५, दोघे रा. शिरसवडी), रामेश्वर गणपत कोंडे (वय ७०), प्रवीण रामदास क्षीरसागर (वय २४, रा. अकोला), राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे), विष्णू गुलाबराव गिरी (वय ५०, रा. वाडेगाव, बाळापूर, अकोला), शंकर लोखंडे (वय १८, रा. बिबवेवाडी, पुणे) यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर बाबूराव मांगुल (वय ७५, रा. चौधरी पार्क, दिघी, पुणे) आदींना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.गंभीर जखमींनी बिले सादर करावीअपघातातील किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना दुसऱ्या वाहनातून प्रवासाला बसवून दिले असून, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांनी पुढील उपचार त्यांच्या गावी जाऊन घेत तेथील रुग्णालयाची बिले जवळील एसटी डेपोमध्ये देऊन बिले घेण्याचे आवाहन शिरूर एसटी आगार व्यवस्थापक गोविंदराव जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावBus DriverबसचालकAccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल