शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

पुण्यात होणार दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी : आयुक्तालयाकडून योजनेचा मसुदा सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:00 IST

यातून दिव्यांग क्रीडापटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे...

ठळक मुद्देखेळाडूला प्रत्येकी ६० हजार रुपयांची मिळणार मदतवार्षिक ६० हजार देण्याबरोबरच निवास शुल्क, गणवेश अशा विविध गोष्टींसाठी २० हजार रुपये

- विशाल शिर्के- पुणे : दिव्यांगांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा, त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, त्यांचा शारीरिक व्यक्तीमत्व विकास व्हावा या उद्देशाने पुण्यात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असलेली क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूमागे क्रीडा प्रशिक्षण आणि निवासासह वार्षिक तब्बल ३ लाख रुपयांचा खर्च करण्याचे प्रस्तावित असून, अपंग कल्याण आयुक्तालयाने त्याचा मसुदा नुकताच राज्य सरकारला सादर केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्रालयाने अपंग कल्याण आयुक्तालयाला दिले होते. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून निवडक खेळाडूंना विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी दिव्यांग खेळाडूंना अडथळा विरहीत वातावरण असलेले मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार व अपंगत्वाच्या प्रकारानुसार सहाय्यक साधने व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. यातून दिव्यांग क्रीडापटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. या शिवाय क्रीडा आरक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंना चांगला रोजगार देखील उपलब्ध होईल.दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षणासाठी वार्षिक ६० हजार देण्याबरोबरच निवास शुल्क, गणवेश अशा विविध गोष्टींसाठी २० हजार रुपये दरमहा निर्वाह भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवासी क्रीडा प्रबोधिनीचे ठिकाण पुणे हेच असेल. या योजनेअंतर्गत शंभर लाभार्थ्यांसाठी वार्षिक ३ कोटी रुपयांचा खर्च येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे. योजनेची जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रबोधिनीसाठी अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर अपंग कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती खेळाडूंची निवड करेल. क्रीडा प्रबोधिनी योजना स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. ------------------हे उमेदवार असतील पात्र-लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा-अपंगत्वाचे प्रमाण किमान चाळीस टक्के असावे-लाभाथ्यार्चे वय ८ ते १४ असावे- शहरी आणि ग्रामीण भागातून निम्म्या उमेदवारांची होणार निवड-------------------अशा असतील योजनेतील सवलती-दिव्यांगाना प्रवास, मदतनीस आणि प्रशिक्षकासाठी सहाय्य- जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे शुल्क देणे-स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक दिव्यांग खेळाडूमागे दरमहा ५ हजार रुपये देणे -गणवेश, निवास निर्वाह भत्त्यापोटी दरमहा २० हजार रुपयांचा भत्ता- एकूण प्रत्येक विद्याथ्यार्मागे वार्षिक ३ लाखांचा होणार खर्च -------------------

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारApang Kalyan Aayuktalayaअपंग कल्याण आयुक्तालय