शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पिचकाऱ्या 'पंटर्स'मुळे शहराच्या साैंदर्यावर डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:28 IST

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असताना काही समाजकंटक त्यावर बाेळा फिरवत आहेत.

- राहुल गायकवाड पुणे : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई असाे की दुभाजकावर करण्यात आलेली रंगरंगाेटी. सार्वजनिक भिंतींवर पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंची चित्रे सुद्धा रेखाटण्यात आली. अशी सगळी पाऊले महापालिककेडून उचलली जात असताना काही समाजकंटक यावर बाेळा फिरवत आहेत. काही मिनिटापूर्वी रंगवलेले दुभाजक पुन्हा पानपिचकाऱ्यांनी लाल रंगाने रंगविण्याची ''किमया'' या समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहर जरी स्वच्छ हाेत असलं तरी ''अस्वच्छ'' मने ''स्वच्छ'' हाेणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. 

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा क्रमांक बराच मागे गेल्याने यंदा विशेष माेहिम पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात आली. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर तसेच थुंकणाऱ्यांवर दंडरुपी कारवाई करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छ करुन घेतले. त्याचबराेबर दुभाजक, सार्वजनिक भिंती यांच्यावर रंगरंगाेटी करण्यात आली. शहरातील अनेक भिंतींवर पुण्याचे चित्ररुपी दर्शन रेखाटण्यात आले हाेते. तर दुसरीकडे दुभाजक पुन्हा एकदा रंगविण्यात आले. परंतु काही समाजकंटकांनी या चित्रांवर, तसेच दुभाजकांवर थुंकून ते लाल करुन टाकले. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेची मेहनत वाया गेल्याचे चित्र आहे. 

चित्ररुपी पुणे सार्वजनिक भिंतींवर रेखाटणारे दीपक चांदणे म्हणाले, आम्ही चित्र रेखाटल्यानंतर तसेच दुभाजक रंगविल्यानंतर काही क्षणातच नागरिकांकडून त्यावर थुंकले जाते. अनेकदा तर लाेक आम्ही काम करत असताना आमच्या अंगावर देखील थुंकले आहेत. या सर्व प्रकारामुळे मनाला वेदना हाेतात. आपली कलाकृती काही मिनिटात खराब हाेताना पाहताना अतिव दुःख हाेते. नागरिकांनी भिंतींवर, दुभाजकांवर न थुंकल्यास शहर सुंदर राहण्यास मदत हाेणार आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात आले. अनेकदा नागरिक रंगविलेल्या भिंतींवर, दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात. ही अत्यंत चुकीची गाेष्ट आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. लाेकांना पालिकेकडून दंड केला जाताे परंतु लाेकांमध्ये जागृती हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराचे आराेग्य चांगले राखण्यासाठी तसेच शहराला सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHealthआरोग्य