शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी दोन प्रवाशांकडे सापडली काडतुसे, पुणे विमानतळावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 11:15 IST

पुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

पुणे - पुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे. असे असताना प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील (58) नावाचे प्रवासी पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाने बंगळुरूला जात होते. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली जात असताना त्यांच्या बॅगेत 22 काडतुसे आढळून आली. हा प्रकार पहाटे पावणेपाच वाजता लक्षात आला. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी पाटील यांना थांबवून ठेवून सामानासह विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असून नजर चुकीने सामानात हे 22 काडतुसे आल्याचे त्यांची सांगितले. त्यांच्या सामानात केवळ काडतुसे असून रिव्हॉल्व्हर नव्हते. 

दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह (60) हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान 2 काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. भगवान चरणसिंह हे रेल्वेत एक्सप्रेसचे चालक आहेत. त्यांचा मुलगा वाघोली येथील आयटी पार्कमध्ये नोकरीला आहे. त्यांच्या सामानात काडतुसे आढळल्याने ते एकदम घाबरुन गेले असून ही काडतुसे कशी आली हे त्यांना सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळPoliceपोलिस