शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे कोटी रुपये दोन महिन्यांत खर्च करा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 13:14 IST

केवळ दोन महिन्यांत म्हणजे मार्च २०२० अखेरपर्यंत हा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान

ठळक मुद्देपुणे जिल्हा नियोजन समितीला नुकताच २०५ कोटी रुपयांचा प्राप्त झाला निधीअर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शंभर टक्के निधीचे वितरण

पुणे : राज्यात शेतकरी कर्जमाफी योजना लागू केल्याने विकासकामांना ‘कट’ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उपमुख्यमंत्री व राज्याच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पवार यांनी विकासकामांना कोणत्याही स्वरुपाची ‘कट’ न लावण्याची भूमिका घेत राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांना शंभर टक्के निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे जिल्हा नियोजन समितीला नुकताच २०५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु यामुळे आता जिल्हा प्रशासनाची चांगली धावपळ होणार असून, केवळ दोन महिन्यांत म्हणजे मार्च २०२० अखेरपर्यंत हा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात विविध विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनअतंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. पुणे जिल्ह्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५२१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. आराखडा ५२१ कोटी रुपयांचा मंजूर केला असला तरी तत्कालीन सेना-भाजप युती सरकारच्या कालावधीत पहिल्या टप्प्यात केवळ ६० टक्केच म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ३१६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताबदल होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. महाआघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातील शेतकºयांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागली आहे. यामुळे कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील विकासकामांना कट लावणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर कोणत्याही स्वरुपामध्ये विकासकामांचा निधी अन्य कामांसाठी खर्च करणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार अजित पवार यांनी आपला शब्द पाळला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांना नियोजनाचा शंभर टक्के निधी वितरित केला आहे. .......मार्चअखेरपर्यंत निधी खर्ची पडेलजिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात आलेल्या ३१६ कोटी रुपयांपैकी ८० टक्के निधी खर्च झाला असून, शिल्लक निधीचे नियोजन करण्यात आले आहे; तसेच दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या खर्चाचेदेखील नियोजन तयार असून, मार्चअखेरपर्यंत जिल्हा नियोजन समितीचा शंभर टक्के निधी खर्ची पडेल, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार