शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

‘बोलक्या अंगणवाड्यां’ची राज्यपातळीवर दखल

By admin | Updated: August 14, 2015 03:21 IST

तब्बल १० वर्षांनंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीचे सदस्य जिल्ह्यातील बोलक्या अंगणवाड्या पाहून भारावले

पुणे : तब्बल १० वर्षांनंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीचे सदस्य जिल्ह्यातील बोलक्या अंगणवाड्या पाहून भारावले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक तर केलेच; शिवाय राज्यात हा उपक्रम मॉडेल म्हणून राबविण्यासाठी विधिमंडळाला सूचना करू, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले. १० आॅगस्टपासून ही समिती ४ दिवसांच्या दौऱ्यावर २० आमदारांची टीम जिल्ह्यात आली होती. आज (दि. १३) त्यांनी त्यांचे कामकाज उरकून निरोप घेतला. या भेटीमुळे अधिकाऱ्यांना धडकी भरली होती. समितीपुढे हजर होताना गृहपाठ पक्का करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह लिपिकापर्यंत प्रत्येक जण कामाला लागला होता. सन २००८-०९ आणि सन २०११-१२ या वर्षांतील लेखापरीक्षण अहवाल आणि सन २०१२-१३ या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवाल तपासला. पहिल्या दिवशी १० आॅगस्ट ते ११ आॅगस्टच्या दुपारपर्यंत अहवाल तपासणी करून दोन-तीन आमदारांची टीम तयार करून तालुका दौरा केला. या टीमने तेराही पंचायत समित्यांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पाणी व स्वच्छता, घरकुल योजना येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. आज सकाळी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चांगल्या कामांचे कौतुक व जिथे दोष आढळले त्याबाबत जाब विचारला. या समितीने सुरुवातीला ‘आम्ही येथे कोणावर कारवाई करण्यास आलेलो नाही. प्रशासकीय कामाला शिस्त व गती मिळावी, हा आमचा उद्देश आहे,’ असे स्पष्ट केले होते. कामकाजाचा कालावधी ६ तासांचा ठरला असतानाही त्यांनी १२ ते १५ तास काम करून तेराही तालुक्यांना भेट दिली. ज्या ठिकाणी यापूर्वीच्या समीतीने अनेक वर्षे भेट दिली नाही ते जिल्हे प्राधान्यक्रमाने घेऊन दर महिन्यात दोन जिल्हे होतील, असे या कमिटीचे नियोजन आहे. या भेटीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नक्कीच गती मिळेल. या भेटीबाबात काही अधिकाऱ्यांनी अशा भेटी नियमित झाल्या, तर प्रशासकीय कामकाजाला नक्कीच शिस्त लागेल व कामात गती येईल, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)