शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरच्या स्मशानभूमीतील चित्रविचित्र घटना! मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी राखच चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:54 IST

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

ठळक मुद्देलवकरच याठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे

लोणी काळभोर: स्मशानभूमीत एखाद्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी आलेल्यांकडून मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गाशेजारी हि स्मशानभूमी आहे. या ठिकाणी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत मरण पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. दुस-या दिवशी सकाळी या मृतदेहाची राख शेजारील ओढ्यात सोडली जाते. या विधीला सावडणे असे म्हणतात. अस्थी एका मातीच्या मडक्यात गोळा करून त्यांचे एखाद्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणच्या नदीतील पाण्यात विसर्जन केले जाते. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अंत्यसंस्कार ते सावडणे या दरम्यान एक रात्र नक्की असते.

या रात्री अंत्यसंस्कार केलेला मृतदेह महिलेचा असल्यास राख व अस्थी चोरीला जात आहेत. सुरवातीला चुकून झाले असेल म्हणून नागरिकांनी या घटनेकडे दूर्लक्ष केले. परंतू आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल तर हा प्रकार सहसा होत नाही. परंतु जर बाहेरगावाहून येऊन येथे रहाणा-या कुटुंबातील महिला असेल. तर नक्कीच हा प्रकार घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही सधन ग्रामपंचायतींनी या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

"या ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील. असे सरपंच राजाराम काळभोर यांनी सांगितले आहे". 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याThiefचोर