शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 02:17 IST

उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय

राजगुरुनगर : आर्थिक वादामुळे अनेक ठिकाणी भावा-बहिणीची नाती मोडकळीस आली आहेत. एकमेकांचे तोंडही न पाहण्याइतपत कटुता निर्माण झाली आहे. अशावेळी भावा-बहिणीचे नाते टिकविण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून खास लोकअदालत भरविण्यात येणार आहे.औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील जमिनींना सोन्याचा बाजारभाव आला आहे. अनपेक्षितपणे मिळणाऱ्या मोठ्या पैशामुळे अनेक घरांमध्ये जागा वाटपावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले. भावा-बहिणीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. रक्षाबंधन व भाऊबीज या पवित्र सणांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. यामुळे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून खेड बार असोसिएशनच्या सहकार्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) अशा खास ६८ दाव्यांसाठी लोकअदालतीचे आयोजन प्रांत कार्यालयात करण्यात आले आहे.यासाठी संबंधित गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना या लोकांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेड तालुक्यातील ३७ गावांतील १०७ बेघर भूमिहीन नागरिकांना त्याच गावातील गायरान जमीन लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. यासंदर्भात, येत्या गुरुवारी (दि. १३) प्रांत कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.प्रत्येक बेघर लाभार्थ्याला अर्धा गुंठा जमीन देण्यात येईल. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खेड तालुक्यातील यापूर्वीच्या प्रस्तावित ८३ लाभार्थ्यांना सोमवारी (दि. १०) जमीन वाटप केले आहे. पालकमंत्री पाणंद योजनेसाठी खेड तालुक्यातून एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे गुरुवारपर्यंत (दि. १३) प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे.७६ दावेकऱ्यांना कडक सूचनाप्रांत कार्यालयात २८०० महसुली दावे प्रलंबित होते. त्यापैकी १५०० दावे निकाली काढले असून, ५०० दावे अन्यत्र वर्ग करण्यात आले आहेत.उर्वरित ८०० दाव्यांपैकी ७६ दावेकरी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा फिरकले नाही, अशा नागरिकांना अंतिम सूचना देण्यात आली असून १९ डिसेंबरपर्यंत त्यांनी संपर्क न केल्यास ते दावे निकाली काढण्यात येतील, असा इशारा प्रसाद यांनी दिला.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे