शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसाठी विशेष नियोजन प्राधिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 01:49 IST

महापालिकेच्या बांधकाम मंजुरीच्या अधिकारांवर गदा

पुणे : मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व बांधकामांचे नकाशे व अन्य मंजुरीसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी) स्थापन करण्याचा प्रस्ताव देऊन महामेट्रोने महापालिकेच्या अधिकारांवर धाड टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मेट्रोसंदर्भातील बांधकामांना मंजुरी देण्याविषयीचे महापालिकेचे सर्व अधिकार संपुष्टात येणार आहेत. याविषयी राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याचेही सांगण्यात आले.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, मेट्रोसाठी यापुढे अनेक स्वतंत्र व्यवस्थांची स्थापन करणे गरजेचे होणार आहे. मेट्रोशी संबंधित सर्व बांधकामांच्या परवानग्या या प्राधिकरणाकडून घेतल्या जातील. त्याच्या रचनेबाबत केंद्र व राज्यस्तरावर चर्चा सुरू असून, लवकरच अंतिम स्वरूप येईल.’मेट्रोमार्गावर प्रत्यक्ष मेट्रो मार्गाशिवाय मेट्रोची ३१ स्थानके, त्याशिवाय स्वारगेट, सिव्हिल कोर्ट येथील भव्य २५ व ४० मजली ट्रान्सपोर्ट हब, मेट्रोची अन्य कार्यालये अशी बांधकामे येणार आहेत. त्यापैकी काहींची प्रक्रियाही सुरू झाली आहे अशी माहिती देऊन दीक्षित म्हणाले, ‘या बांधकामांना महापालिकेकडून परवानगी घेणे त्यांच्या एकूण व्यापामुळे अशक्य आहे. महामेट्रोने मेट्रो मार्गाचे वेळापत्रकच तयार केले आहे. त्यानुसार काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्वरित मंजुरी मिळावी, आवश्यक त्या गोष्टींची पाहणी व्हावी यासाठी असे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे गरजेचे झाले आहे.’महापालिका उद्ध्वस्त करण्याचा डावमहापालिकेला आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचाच या सरकारचा डाव दिसतो आहे. स्मार्ट सिटी व आता महामेट्रो हे दोन्ही केंद्र सरकारचे उपक्रम आहेत, व दोन्हीसाठी महापालिकेचा आर्थिक आधार घेत आहेत. त्यात महापालिका उद्ध्वस्त होत आहे याचे त्यांना काहीच वाटत नाही, उलट त्यासाठीच असे निर्णय घेतले जातात का, अशी शंका यावी इतपत हे प्रकार वाढले आहेत. - चेतन तुपे, विरोधी पक्षनेतेशहराच्या हितासाठीच निर्णयमेट्रोच्या प्रकल्प अहवालातच हा विषय होता. त्यामुळे तो काही नवीन नाही. मेट्रोची निर्मिती हा कालबद्ध कार्यक्रम आहे. मागील सरकारच्या नाकर्तेपणामुळे या प्रकल्पाला १५ वर्षे विलंब झाला. तो गतीने पुढे जावा, विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना हा त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे कोणाचे अधिकार काढले जात आहेत, या टीकेत काही अर्थ नाही असे मला वाटते. शेवटी मेट्रो शहराच्या हितासाठी केली जात आहे, त्यामुळे या निर्णयात काही गैर आहे असे मला वाटत नाही.-योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीमेट्रोच्या कामामुळे पौड रस्त्यावर भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) केबल्सचे नुकसान झाले आहे. ते सर्व नुकसान भरून दिले जाईल असे दीक्षित यांनी सांगितले.ठेकेदार कंपनीला काम व्यवस्थित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे खोदाईचे काम सुरू असताना असे नुकसान होणे अपेक्षित असते. ते भरून दिले जाईल.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे