शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

चीनशी लढण्यासाठी स्पेशल फ्रंटियर फोर्स; छुप्या कारवायांसाठी माहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:50 IST

२९-३० ऑगस्टला अक्साई चीन प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांवर मिळविला ताबा

- निनाद देशमुख पुणे : पाकिस्तानने १९८४ मध्ये एका क्षुल्लक अशा केलेल्या चुकीमुळे सावध झालेल्या भारताने रणनीतीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सियाचीनवर ताबा मिळविला होता. यामुळे पाकिस्तानला हात चोळत बसावे लागले होते. तसाच काहीसा प्रकार आता भारत-चीन सीमावादात पेंगाँग सरोवरालगतच्या दक्षिण शिखरांबाबत उघडकीस आला आहे. भारताने अनपेक्षितपणे हालचाली करीत २९-३० ऑगस्टच्या रात्री अक्साई चीनमधील महत्त्वाचा भाग स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या साह्याने ताब्यात घेत तिथे भारतीय तिरंगा फडकविला. या कारवाईमुळे चिनी लष्कराचे तिबेटी पठारावरील तळ भारताच्या टप्यात आले आहेत.

चीनला शह देण्यासाठीच १९६२ च्या युद्धानंतर तेव्हाचे आयबीचे संस्थापक डायेक्टर भोलानाथ मलिक तसेच दुसऱ्या महायुद्धातील सैनिक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री राहिलेले बिजू पटनायक यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या फोर्सची स्थापना केली होती. भविष्यात भारताशी चीनचे युद्ध झाले तर चीनच्या क्षेत्रात घुसून वेगाने कारवाया करणे हे या फोर्सचे उद्दिष्ट होते. या संस्थेचे पहिले प्रमुख मेजर जनरल सुजानसिंग उबन हे होते.

सुजानसिंग उबन दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या २२ माऊंटन डिव्हिजनचे कमांडन्ट होते. यामुळे या दलाला सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट २२ असे संबोधले जात होते. चीनला तोंड देण्यासाठी सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने १९५०च्या दशकात भारताची तेव्हाची गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) मदतीने तिबेटी बंडखोरांना प्रशिक्षित केले. सुरुवातीला नेपाळमध्ये त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. चीनने तिबेट गिळंकृत केला, तेव्हा याच बंडखोरांनी १४ वे धर्मगुरू दलाई लामा यांना भारतात आणले. मोठ्या प्रमाणात तिबेटी नागरिकही भारतात आलेहोते.या फोर्समध्ये प्रामुख्याने लडाख, सिक्कीम येथील नागरिक तसेच भारतात आश्रय घेतलेल्या तिबेटी नागरिकांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्वतरांगामध्ये लढण्याचा अनुभव असल्यानेच त्यांना या फोर्समध्ये घेण्यात आले. आता गोरखा आणि बॉन वंशीय नागरिकांचाही या दलात समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला आयबीच्या अखत्यारित येत असलेली ही संस्था आता भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनॅलिसीस विंग (रॉ) यांच्या अखत्यारित काम करते. याचे मुख्यालय उत्तराखंड येथील छाकारता येथे आहे. सुरुवातीला सीआयए आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी एसएसएफमधील जवानांना प्रशिक्षण दिले.

कुठल्याही प्रकारच्या कारवाया करण्यास सक्षम

स्पेशल फ्रंटियर फोर्स अतिशय गुप्तपणे लष्करी कारवाया पार पाडते. लष्करासारखे कार्य असले, तरी ही संस्था लष्कराच्या आधिपत्याखाली येत नाही. ‘रॉ’च्या आधिपत्याखाली ही फोर्स कार्य करते. डायरेक्टर जनरल सिक्युरिटी यांच्या माध्यमातून ही फोर्स थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करीत असते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारत