शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी, सरोदे मावशी! बेड न मिळाल्याने पुण्यात वयोवृद्ध महिलेने घरीच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 01:00 IST

कुठेतरी ऍडमिट करा अशी विनवणी करणाऱ्या मावशींना बेड मिळावा म्हणून २४ तास प्रयत्न केले मात्र पदरी निराशाच आली.

पुणे : वय वर्ष ७७़ मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एक ह्दयविकाराचा झटका येऊन गेलेला. अशा महिलेला कोरोनाची लागण झाली. तब्बल एक दिवस घरातील लोक तसेच सामाजिक कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी सोमवारी दुपारी त्यांनी घरातच शेवटचा श्वास घेतला. आपल्याला कुठे तरी अ‍ॅडमिट करा अशी विनवणी करणार्‍या मावशीसाठी आपण काही करु शकलो नाही, हतबलतेतून कार्यकर्त्यांनी सॉरी सरोदे मावशी असा संदेश व्हॉटसअ‍ॅपवर टाकला. त्यातून या ज्येष्ठ महिलेला शेवटच्या क्षणी झालेल्या यातना वाचून जनवाडी परिसर हेलावून गेला. 

शकुंतला बबन सरोदे (वय ७७, रा. हनुमान मंदिराशेजारी, जनवाडी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव संजय सरोदे यांनी सांगितले की मी माझा भाऊ व आमच्या दोघांच्या पत्नी, मुले एकत्र राहतो. आई घरीच असायची. सकाळी फक्त व्यायामासाठी फिरायला जात असे. दोन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यानुसार रविवारी त्यांची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने महापालिकेच्या संपर्क क्रमांकावर बेडसाठी प्रयत्न केले. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातही काहींनी जाऊन कोठे बेड उपलब्ध आहे का याची चौकशी केली. मात्र, कोठेही बेड मिळू शकला नाही. सोमवारी सकाळपासून त्यांची तब्येत खालावत गेली. शेवटी दुपारी त्यांची प्राणज्योत मालविली.

याबाबत उमेश वाघ यांनी सांगितले की, सरोदे मावशी यांना बेड मिळावा, यासाठी या भागातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. परंतु, आम्हाला अपयश आले. त्यांच्या यातना आणि कुटुंबियांची हतबल झालेली परिस्थिती आम्ही थांबवू शकलो नाही.

गेल्या काही दिवसात गोखलेनगर, जनवाडी परिसरात ७५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्याचे आमच्या हाती राहिले.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल