शिरूर तालुक्यात ज्वारीचे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:24+5:302021-01-13T04:26:24+5:30
या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील पिके बहरली आहेत. तसेच चासकमान पाणी आवर्तन सुटल्याने या भागातील ...

शिरूर तालुक्यात ज्वारीचे पीक जोमात
या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील पिके बहरली आहेत. तसेच चासकमान पाणी आवर्तन सुटल्याने या भागातील रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात आलेली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे तालुक्यात व परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती . मुख्यतः पीक वाढीसाठी यंदा हवामान अनुकूल असल्याने रब्बी ज्वारीची वाढ ही जोमात आहे . ज्वाऱ्या निसवून कणसे बाहेर पडू लागल्याने आता ज्वारीचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला असून शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. गेल्या दोन तीन वर्षानंतर यंदा कोवळे दाणे टिपायला मिळत असल्याने शिवारांमधून पक्ष्यांचा वावर वाढलेला असताना बहुतेकांकडून बुजगावण्यांसह विविध कल्पना वापरून शेतीसाठी राखणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे ज्वारी पीक पक्ष्यांपासून वाचविताना शेतकरी गोफन घेऊन शेतात राखण करत आहे .यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा व चारा पीके हिरवीगार व जोमदार असून हरभरा पीक फुलोऱ्यात तर ज्वारी हुरड्यात आली आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडले असून शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
११ रांजणगाव सांडस