पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 08:41 PM2019-08-09T20:41:06+5:302019-08-09T20:44:57+5:30

काेल्हापूर, सांगली येथील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन पवारांनी करताच बारामतीकर मदतीसाठी सरसारवले असून धान्य, राेख अशा विविध पद्धतीने मदत करण्यात येत आहे.

As soon as Pawar appealed to help drought victims ; baramatikar gathered help of rs 1 corer | पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत

पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत

Next

बारामती : राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करताच एकट्या बारामती शहरातून अवघ्या तासाभरात एक कोटी रुपयांची रक्कम बारामतीकरांनी उभी केली. तर, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने गहू, ज्वारी आणि तांदळाची प्रत्येकी ५० पोती देऊ केली आहे. बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवनामध्ये व्यापारी, नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आदींची बैठक शरद पवार यांनी घेतली. 

सामान्य व्यापाऱ्यांनीसुद्धा कमीत कमी पाच हजारांपासून पुढे रक्कम देत पूरग्रस्तांसाठी बारामतीकर धावून येणार असल्याचा धीर दिला. सांगली जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २५ लाख रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ लाख असे एकूण ५० लाख रुपये एकट्या विद्या प्रतिष्ठानच्या वतीने देण्याची घोषणा शरद पवार यांनी या वेळी केली. राज्यात संकटाच्या परिस्थितीत बारामतीकर प्रत्येक वेळी पुढे आलेला आहे. यंदाही देशभरात सर्वांत आधी बारामतीकर पूरग्रस्तांसाठी धावून आले. ‘बारामती तालुका पूरग्रस्त निधी’ असे बँकेत खाते उघडावे व त्यामध्ये थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रक्कम वर्ग करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.  ज्या स्वरूपात मदत दिली जाईल, त्याची पावती देण्याचीही सूचना पवार यांनी या वेळी केली. रयत भवन येथून ही मदत पूरग्रस्त भागांमध्ये गरजेनुसार पाठवली जाणार असल्याचे शेवटी शरद पवार यांनी सांगितले.

या वेळी माजी नगराध्यक्ष जवाहर शहा यांनी रोख रकमेसह साखर कारखान्याच्या वतीने साखर, तर व्यापाऱ्यांच्या वतीने गहू, ज्वारी, तांदूळ यासारखे धान्य तसेच पाणी, औषधे व कपडे पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहेत. यासाठी बारामतीकरांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी  नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, पोपटराव तुपे,  माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, सचिन सातव, श्रीकांत सिकची, महावीर वडूजकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले. गटनेते सचिन सातव यांनी आभार मानले. 

बारामती खरेदी-विक्री संघ, छत्रपती सहकारी साखर कारखाना, बारामती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांनी त्यांच्या कामाचा एक दिवसाचा पगार, वीर सावरकर जलतरण तलाव ३ लाख रुपये, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी ५ लाख, महालक्ष्मी उद्योगसमूहाचे प्रमुख सचिन सातव यांनी २ लाख ५१ हजार अशी मदत केली. 

बारामती मर्चंट असोसिएशन आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ट्रक धान्य, छत्रपती सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी १०० पोती साखर, तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ५१ साखरपोत्यांची मदत करण्यात आली.

Web Title: As soon as Pawar appealed to help drought victims ; baramatikar gathered help of rs 1 corer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.