संविदणेच्या सरपंचपदी सोनाली खैरे, तर उपसरपंचपदी भाऊसाहेब लंघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:59+5:302021-03-01T04:11:59+5:30

माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या नेतृत्वाखाली संविदणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसची सत्ता आली. ११ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ईश्वर ...

Sonali Khaire as Sarpanch, Bhausaheb Langhe as Deputy Sarpanch | संविदणेच्या सरपंचपदी सोनाली खैरे, तर उपसरपंचपदी भाऊसाहेब लंघे

संविदणेच्या सरपंचपदी सोनाली खैरे, तर उपसरपंचपदी भाऊसाहेब लंघे

माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या नेतृत्वाखाली संविदणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसची सत्ता आली. ११ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे, ॲड. भोलेनाथ पडवळ, रवींद्र पडवळ, शुभांगी पडवळ, नंदा पुंडे, रेखा भोर, मनीषा नरवडे, मालुबाई मिंडे, हे निवडून आले. सरपंच व उपसरपंच पदासाठी ही निवडणूक बिनविरोध झाली. माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, पॅनलप्रमुख माजी सरपंच वसंत पडवळ, माजी सरपंच संतोष मेचे, माजी सरपंच मोहन किठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, रामदास पडवळ, प्रमोद नरवडे, बाळासाहेब पडवळ, मनोहर नरवडे, हनुमंत लंघे,पोपट शिंदे, सुनिल नरवडे, हे उपस्थित होते. या वेळी सरपंच सोनाली खैरे व उपसरपंच भाऊसाहेब लंघे म्हणाले की, मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे .

२८ टाकळी हाजी संविदणे

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित असलेले पोपटराव गावडे, वसंत पडवळ, बाळासाहेब भोर व इतर.

Web Title: Sonali Khaire as Sarpanch, Bhausaheb Langhe as Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.