मावडी कप सरपंचपदी सोनाली चाचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:17 IST2021-02-18T04:17:09+5:302021-02-18T04:17:09+5:30

मावडी कप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरपंच पदासाठी सोनाली चाचर आणि सारिका ...

Sonali Chachar as Mawdi Cup Sarpanch | मावडी कप सरपंचपदी सोनाली चाचर

मावडी कप सरपंचपदी सोनाली चाचर

मावडी कप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरपंच पदासाठी सोनाली चाचर आणि सारिका भामे यांचे उमेदवारी अर्ज आले होते, तर उपसरपंच पदासाठी सुवर्णा तोरवे आणि बाळासाहेब जगताप यांचे अर्ज दाखल झाले होते.

निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार सोनाली चाचर आणि उपसरपंच पदाच्या उमेदवार सुवर्णा तोरवे यांना पाच मते मिळाली. विरोधी उमेदवारांना प्रत्येकी चार मते पडली. निवडणूक अधिकाऱ्यांनी सोनाली चाचर यांची सरपंच आणि सुवर्णा तोरवे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल गजानन चाचर, विनायक बबन पांडे, दत्तात्र्यय बाजीराव पोटे, तेजस्वी नवनाथ कुंजीर, सुरेखा राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.

निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना लाला अण्णा जगताप, किशोर भामे, संदीप भामे, रामदास चाचर, जालिंदर गायकवाड, शंकर जगताप, चंद्रकांत भामे, आकाश कामठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

१७ जेजुरी मावडी

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: Sonali Chachar as Mawdi Cup Sarpanch