शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध जुळवून लग्नाचे आमिष; अत्याचार अन् गर्भपातही केला, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:23 IST

दोघांचे लग्न झाले असून कौटुंबिक वादातून बदनामी करण्याच्या उद्देशाने बलात्कार सारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे, असे वकिलांनी सांगितले आहे

पुणे : तरूणीशी प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. याप्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. पिडीत तरूणीचा व्यवसाय आहे. ती देखील आरोपीच्या जवळच असलेल्या परिसरात राहण्यास आहेत. करण नवले आणि तिची २०२१ मध्ये एका जीमध्येमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते. त्यांच्यात मैत्री आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असत. काही दिवसांनी पिडीतने करणला लग्नाबाबत विचारणा केली त्यावर त्याने टाळाटाळ केली. पिडीतेला त्याचे इतर मुलींशी प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर नवले याने तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले. घडलेली हकीकत तिने त्याच्या आईला सांगितली. त्यावर करणने तिला १७  डिसेंबर २०२२ रोजी भेटून मला शेवटचे भेट नाही तर मी तुला संपवून टाकेल अशी फोनवरून धमकी दिली. त्यावर तिने पुन्हा त्याच्या आईला प्रकार सांगितला. त्यावर त्याच्या आईने तु माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे, तुझ्यापर्यंत पोहोचायला मला पाच मिनिटे लागणार नाही,  तु या परिसरात राहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. त्यानंतर करणने पुन्हा पिडीतेला गळ घालून मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे म्हणत पुन्हा नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून तरूणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने घरचे आता लग्नासाठी ऐकणार नाही म्हणत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये तरूणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाले. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदी येथे त्यांनी लग्न केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. ती गर्भवती असताना त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवले. तसेच गर्भपात करण्यासाठी बाटलीत गोळ्या घालून प्यायला लावले. परंतु त्याच्या या प्रकाराला घाबरून आजीची तब्बेत खराब असल्याचे सांगून तीने अहिल्यानगरला जायचे आहे असे खोटे सांगितले. १३ मार्च रोजी पीडिता पुण्यात आली, नंतर तिने या अत्याचाराचाबाबत तक्रार दिली. 

मुंबई उच्च न्यायालयात जाणार

भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाच्या बाबतीत नमूद गुन्ह्यातील मुलगी ही गरोदर असून या दोघांचे 16/02/2025 रोजी आळंदी लग्न झाले आहे. केवळ कौटुंबिक वादातून, नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने लग्न झाले असूनही बलात्कार सारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे. या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा रद्द आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहोत. - वकील विजयसिंह ठोंबरे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नPregnancyप्रेग्नंसी