शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा, मुलगी आणि आई यांची पोलिसांनाच धक्काबुक्की! तिघांची थेट केली तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 21:09 IST

अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

ठळक मुद्देविनामास्क चारचाकीतून फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी कारवाईसाठी घेतले होते बाजूला

धायरी: कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने पुणे शहरासह उपनगरात पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत नाकाबंदी करत कर्तव्य बजावत आहेत. मात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याने एका तरुणासह दोन महिलांवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रितेश माणिक जगधने ( वय: २८ वर्षे, सोमनाथ नगर, वडगांव शेरी,) छाया माणिक जगधने (वय : ६१ वर्षे)  व सुषमा राजेश दोषीलकर (वय: ३४ वर्षे) असे मुलगा, मुलगी व आई यांना याप्रकरणी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस सोमवारी धायरी येथील उंबऱ्या गणपती चौकात नाकाबंदी करत होते. दरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून आसन क्षमतेपेक्षा जास्त असे ७ जण विनामास्क प्रवास करताना आढळून आल्याने त्यांना नियमानुसार पावती करण्यास सांगितले.

त्यावेळी पोलिसांच्या हातातील पावती पुस्तक हिसकावून घेऊन ' मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून सोबतच्या व्यक्तींना आपले कार्यकर्ते बोलावून घे, ह्यांना हिसका दाखवतो हिथं तमाशाच करतो, रस्ता रोको करतो, लय झाली ह्यांची नाटकं असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. लोकांची गर्दी जमवून पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच हवालदाराला लाथ मारून शासकीय कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला