शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’चा ३ हजार दर जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 02:07 IST

जिल्ह्यातील पहिलाच कारखाना; सर्वांत जास्त एफआरपी केली अदा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गळीत झालेल्या ऊस बिलापोटी प्रतिटन तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे. तीन हजार दर जाहीर करणारा सोमेश्वर जिल्ह्यात पहिला कारखाना ठरला आहे.आज संचालक मंडळाच्या पार पडलेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामात पुणे जिल्ह्यात क्रमांक एकने वाटचाल करत ९ लाख ७९ हजार उसाचे गाळप करत क्रमांक एकचा ११.९९ टक्केचा साखर उतारा ठेवत ११ लाख ७४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखाने जिल्ह्यात सर्वांत जास्त २६४२ रुपये एफआरपी एकरकमी अदा केली आहे, संचालक मंडळाच्या सभेत सभासदांच्या उसाला ३०००, तर गेटकेन धारकांना २८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.जगताप पुढे म्हणाले की, आपण बाहेरील कारखान्याची परिस्थिती पाहिल्यास काही कारखान्यानी अद्याप सभासदांना एफआरपी अदा केली नाही. तसेच, त्याची ऊसतोडणी बिलेही देणे बाकी आहेत, परंतु सोमेश्वरने कर्जाची वेळेत परतफेड करत, सभासदांना चांगला दर देण्याचा निर्णय घेतल्याने संचालक मंडळाला समाधान वाटत आहे. तसेच सभासदांच्या ऊस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषिभूषण संजीव माने यांचे व्याख्यान कार्यक्रम पार पडले होते.कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि. २८) रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी १ वाजता आयोजित केली असून सभासदानी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.अ‍ॅडव्हान्स अदायेणाऱ्या हंगामासाठी आजपर्यंत २९ हजार ४०० एकरांवर ऊस लागवडची नोंद झाली आहे, या अतिरिक्त ऊस गाळपास कारखान्याने ११०० बैलगाडी, ३५० ट्रक ट्रॅकटर, २०० डम्पिंग आणि ७ हार्वेस्टरशी करार केले असून सर्व ऊसतोडणी यंत्रणेस अ‍ॅडव्हान्स अदा केलेला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे